मालाड पाठोपाठ दहिसरमध्ये ३ घरे कोसळली

    दिनांक  10-Jun-2021 21:33:52
|

Dahisar_1  H x
 
 
 
मुंबई : बुधवार रात्रीपासुन मुंबईत पावसाची जोरदार बॅटिंग सुरु आहे. पहिल्याच पावसानंतर बुधवारी रात्री मालाडमध्ये मोठी इमारत दुर्घटना घडली व त्यात ११ जणांचा मृत्यु झाला होता. त्यापाठोपाठ आता दहिसरमध्येही ३ घरे कोसळल्याची धक्कादायक माहिती पालिका प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे. या दुर्घटनेत एका २६ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. दहिसर पुर्वमधील केतकीपाडा परिसरातील चव्हाण चाळ या ठिकाणी ही दुर्घटना घडली आहे. घराखालची माती सरकल्यामुळे 3 घरं कोसळली. गुरुवारी संध्याकाळी सहा ते साडे सहाच्या सुमारास ही दुर्घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे.
 
 
 
गेले २ दिवस झाले मुंबईमध्ये पावसाच्या सारी चालू आहेत. जागोजागी पाणी साचल्याचे दिसत आहे. अशामध्ये बुधवारी रात्री एका इमारत दुर्घटनेत ११ जणांचा मृत्यू झाल्याची बातमी आली. मात्र, आता दहिसरमध्ये ३ घरे कोसळल्याची बातमी समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दहिसर येथील शिवाजी नगर मधील लोखंडी चाळ येथे तीन घरे कोसळली. मुसळधार पावसामुळे ही घरे कोसळली असल्याची प्राथमिक देण्यात येत आहे. सायंकाळी साडे सात वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. यामुळे पुन्हा एकदा धोकादायक बांधकामाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.