चिनी अँपकडे अमेरिकेन नागरिकांची गोपनीय माहिती

    दिनांक  10-Jun-2021 12:58:49
|

china_1  H x W:

 
वॉशिंग्टन : अमेरिकी प्रशासनाने चीनच्या टिकटॉक आणि वीचॅट वर प्रतिबंध लावण्यासंबंधीचा निर्णय परत घेतला आहे. अमेरिकाने टिकटॉक आणि वीचट वर प्रतिबंध लावण्याचा पूर्व राष्ट्रपति डोनाल्ड ट्रंप यांच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे. चीनच्या या ऐप्लिकेशनशी निगडित राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात येते कि नाही यासाठी अमेरिकेने स्वतः समीक्षा करण्याचा निर्णय घेतला आहे.


पुराव्यावर आधारित विश्लेषण केले जाईल.
 
. व्हाइट हाउस ने बनविलेल्या नवीन कार्यकारी संघटनेच्या कॉमर्स डिपार्टमेंटला चीन द्वारा बनविल्या गेलेल्या,चीनद्वारे कंट्रोल करू शकणाऱ्या अँप शी निगडित सर्व व्यवहाराची 'एविडेंस बेस्ड' विश्लेषण करण्याचा आदेश देण्यात आला आहे. तेथील अधिकारी विशेषतः त्या अँप ना घेऊन चिंतीत आहेत ज्या प्राइवेट डेटा जमा करतात आणि ज्या अँप चा चीनच्या गुप्त संघटनेशी संबंध आहे.

 
अमेरिकेला अजूनही सतावत आहे चिंता .
 
अमेरिकी प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनुसार अमेरिकेच्या जेनेटिक किंवा आरोग्याशी निगडित असणाऱ्या माहितीविषयी गोपनीयतेसाठीचे सल्ले सुद्धा हि नवीन संस्था देईल. तसेच हि संस्था हे संघटन चीन आणि इतर विरोधी देशांशी जोडल्या गेलेल्या काही सॉफ्टवेयर ऐप्लिकेशन च्या धोक्यावर लक्ष देईल. जो बायडेन यांच्या या आदेशावरून अशी शक्यता वर्तविली जात आहे कि चीनच्या अँप कडे अमेरिकन नागरिकांची गुप्त माहिती 'स्टोर' आहे.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.