अनुप चंद्रा पांडे नवीन इलेकशन कमिशनर

10 Jun 2021 14:25:56

anup chandra_1  
 

नवी दिल्ली : निवृत्त सनदी अधिकारी अनुप चंद्रा पांडे यांनी बुधवारी इलेकशन कमिशनर म्हणून पदभार स्वीकारला आहे . इलेक्शन कमिशनर ऑफ इंडिया(ECI) ने हि माहिती दिली आहे. अनुप पांडे हे १९८४ बॅचचे IAS अधिकारी असून उत्तर प्रदेश हे त्यांचे केडर होते.मुख्य इलेकशन कमिशनर(CEC) सुशील चंद्र आणि इलेकशन कमिशनर राजीव कुमार यांच्यासोबत थ्री मेंबर कमिशन पूर्ण करण्यासाठी जॉईन झाले आहेत.
 
 
 
अनुप चंद्र यांच्या नेतृत्वखाली उत्तर प्रदेश मध्ये यशस्वीरीत्या कुंभ मेळा प्रयोगराज येथे आणि प्रवासी भारतीय दिवस वाराणसीमध्ये यशस्वीरीत्या पूर्ण झाले आहेत.अनुप पांडे यांनी डिफेन्स,लेबर आणि एम्प्लॉयमेंट मंत्रालयात काम केले आहे. पांडे यांनी गव्हर्नमेंट इन अँसिएंट इंडिया हे पुस्तक लिहिले असून यात आपल्याला प्राचीन भारतातील गव्हर्नमेंट विषयी अत्यन्त उपयुक्त माहिती मिळते. अनुप पांडे यांची नियुक्ती राष्ट्रपती द्वारे झाली असून त्यांना मर्यादा काळ संपलेल्या सुनील अरोरा यांच्या ठिकाणी नियुक्ती झाली आहे 
Powered By Sangraha 9.0