चीनमध्ये 'बर्ल्ड फू'चा विषाणू : ४१ वर्षीय व्यक्ती संक्रमित

    दिनांक  01-Jun-2021 19:58:26
|

CHINA _1  H x W


बिजिंग : सर्वात पहिल्यांचा कोरोना विषाणू आढळलेल्या चीनमधून आता आणखी एक डोकेदुखी पुढे आली आहे. आता चीनच्या पूर्व प्रांतातील जिआंगसूमध्ये 'बर्ड फ्लू स्ट्रेन' हा विषाणू आढळला आहे. हा विषाणू मानवसंक्रमित होण्याचा धोका जास्त आहे, असे सांगितले जात आहे. चीनच्या राष्ट्रीय आरोग्य विभागाने याला दुजोरा दिला आहे. हा विषाणू मानवी शरीरात जाण्याचा पहिलीच वेळ आहे.
 
 
चीनच्या राष्ट्रीय आरोग्य विभागाच्या संकेतस्थळावर याबद्दल माहिती देण्यात आली आहे. त्यात उल्लेख केल्यानुसार, H10N3 बर्ड फ्लू स्ट्रेनमुळे ४१ वर्षांचा एक व्यक्ती बाधित झाला आहे. कोंबड्या विक्रीचा त्याचा व्यावसाय आहे. दरम्यान हा विषाणू पसरण्याची शक्यता तशी कमीच आहे, असेही सांगण्यात आले आहे. संपर्कात आलेल्यांवर नजर ठेवण्यात आली आहे.
 
 
'चाइनीज सेंटर फॉर डिजीज कंट्रोल अॅण्ड प्रिव्हेंशनतर्फे देण्यात आलेल्या माहितीनुसार, प्रत्येकाच्या रक्ताचे नमुने मागविण्यात आले होते. HI0N3 बर्ड फ्लू स्ट्रेनसह संक्रमित झालेल्या व्यक्तीची कोरोना चाचणी केली जात आहे. या सर्वांना निगराणीखाली ठेवले जात आहे.
 
 
मेलेल्या पक्ष्यांपासून दूर रहा
 
 
या प्रकरणी तज्ज्ञांनी मृत किंवा आजारी पक्षांच्या संपर्कात येऊ नये, असे आवाहन केले जात आहे. ज्या भागात अशा प्रकारचे रुग्ण आढळतील त्यांच्याशी संपर्क टाळायला हवा, असे आवाहन त्यांनी केले आहे.
 
 
फेब्रुवारीत मिळाला H5N8 एवियन इन्फ्ल्यूएन्जा
 
चीनमध्ये वियन इन्फ्ल्यूएन्जाचा नवा स्ट्रेन फेब्रुवारीपासून आढळला आहे. या विषाणूचे अनेक कोरोना स्ट्रेन आहेत. या पूर्वी फेब्रुवारीत चीनच्या लियानयुंगंग शहरात H5N8 एवियन इन्फ्लूएन्जा पसरण्याची सूचना देण्यात आली आहे. हा विषाणू बर्ल्ड फ्लूसारखा विषाणू आहे, असे सांगण्यात आले आहे. हा केवळ मानवासाठीच धोकादायक मानला जात आहे, एप्रिलमध्ये जंगली पक्ष्यांमध्येही हा विषाणू आढळला होता.


आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.