PHOTO:पहा 'मोदी साहेबांना' काश्मीरच्या चिमुकलीची हाक

    दिनांक  01-Jun-2021 15:52:48
|

kashmir girl_1  
 
 
 
जम्मू काश्मीर : सर्वत्र कोरोना महामारीला सुरूवात झाल्याने, केवळ कामच नाही तर शाळा आणि महाविद्यालये देखील ऑनलाइन झाली आहेत. सोशल मीडियावर आता व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये काश्मिरमधील ६ वर्षीच्या मुलीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एका व्हिडिओतून संबोधित केले.
 
 
व्हिडीओमधील मुलगी मोदींना ‘मोदी साहेब’संबोधून प्रश्न करते की खालच्या वर्गातील मुलांना मोठ्या वर्गातील मुलांप्रमाणे खूप वेळ चालणाऱ्या तासांच्या वर्गात का उपस्थित रहावे लागते आणि तिच्या उच्च वर्गातील मुलांप्रमाणे खालच्या वर्गातील मुलांवर गृहपाठाचे का ओझे आहे? सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत तिला इंग्रजीपासून सुरू होणाऱ्या ऑनलाईन वर्गात उपस्थित रहावे लागते, त्यानंतर गणित ,उर्दू व ईव्हीएस या विषयांच्यासूद्धा ऑनलाईन वर्गात उपस्थित रहावे लागते. हा व्हिडीओ 'सोशल मीडियावर' खूप 'व्हायरल' झाला आहे आणि हा 'व्हीडीओ' पाहून सर्वांच्या चेहऱ्यावर हास्य उमटत आहे.
 
 
 
या 'व्हिडीओला' आतापर्यंत ४ लाख ५० हजार एवद्या लोकांनी पाहिले असून .हि मुलगी सर्वांना प्रभावित करत आहे. या व्हिडिओला जम्मू आणि काश्मीर च्या 'LG' ने हि 'रिट्विट' केले आहे. त्यात ते म्हंटले आहेत कि आम्ही शाळांना अशी सूचना दिली आहे कि त्यांनी अभ्यासाच्या वेळेचे असे नियोजन करावे जेणेकरून भार कमी होऊन तो ४८ तासात गुंडाळावा. बालपण हे अत्यंत निरागस असते आणि प्रत्येकाचे बालपण आनंदाने भरून जावे .
 
 
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.