PHOTO : कसा रचला जात आहे अयोध्या राम मंदिराचा भक्कम पाया!

    दिनांक  01-Jun-2021 14:33:03
|

Ram Mandir _1  अयोध्या : अयोध्या रामजन्मभूमी येथे भव्य मंदिर उभारणीची जोरदार तयारी सुरू आहे. तज्ज्ञांनी दिलेल्या सूचनेनुसार पाया रचताना एकूण ४४ थराचा भराव टाकण्यात येणार आहे. श्री रामजन्मभूमि परिसरात पाया उभारणीसाठी गेल्या काही दिवसांपासून खोदकाम सुरू आहे.

Ayodhya _5  H x 
 
 
त्याबद्दल तज्ज्ञांचे व रचनाकारांचे मत जाणून घेण्यात आले होते. Roller Compacted Concrete तंत्रज्ञानाद्वारे तब्बल १ लाख २० हजार घन मीटर माती घटवण्यात आला आहे. श्री राम जन्मभूमि तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांनी सोमवारी या मंदिर परिसराची पाहणी केली. ऑगस्टपर्यंत पाया उभारणीचे काम तयार होईल, अशी माहिती त्यांनी दिली.
 

Ayodhya _5  H x 
 
 
चंपतराय म्हणाले, "चारशे फूट लांब आणि तिनशे फूट रुंद अशा १ लाख २० हजार स्वेअर फूट परिसरात पाया उभारला जात आहे. त्यात ४४ थर उभारले जातील. १२ इंच जाडीचे हे आवरण रोलर फिरवल्यानंतर १० इंचाचे राहते. ही जमीन समुद्र सपाटीपासून ९३ मीटर उंचावर आहे."
 

Ayodhya _3  H x 
 
अयोध्येत राम मंदिराचा पाया उभारणीसाठी काढण्यात येणारी माती प्रत्येक हिंदू भाविकांच्या घरोघरी पोहोचवण्याची योजना तयार होत आहे. रामललाचे दर्शन करण्यासाठी येणाऱ्या प्रत्येक भाविकाला ही मृदा मिळणार आहे. भाविक श्रद्धेने ही मृदा लहान डब्यांद्वारे घरोघरी नेणार आहेत. मात्र, कोरोनामुळे इथे काही निर्बंध आणल्याने हा उपक्रम स्थगित ठेवण्यात आला आहे.
 

Ayodhya _1  H x 
 
 
श्री राम जन्मभूमि तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या कार्यालयाचे प्रभारी प्रकाश गुप्ता यांच्या मते, मंदिर निर्माणाद्वारे बाहेर येणारी माती ही कारसेवक पुरममध्ये ठेवण्यात येणार आहे. मठ-मंदिरांतील संत आणि श्रद्धाळूंनी राम मंदिराकडील मिळालेले रजकण देण्याची मागणी केली होती. इथूनच छोट्या डब्यांमध्ये बंद करून वितरीत केली जात होती.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.