कोविडकाळातही मालवाहतुक भारतीय रेल्वेचा नवा विक्रम

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Jun-2021
Total Views |

rlwy_1  H x W:


मालवाहतुकीतून 11604.94 कोटी रुपये उत्पन्न


नवी दिल्ली (वृत्तसंस्था): कोविडचे आव्हान असतानाही भारतीय रेल्वेने मे 2021 मधे मालवाहतुक आणि उत्पन्न या दोन्ही बाबतीत मोठी कामगिरी बजावली आहे.

युद्धपातळीवर काम करत भारतीय रेल्वेने मे महिन्यात आतापर्यंतची सर्वाधिक मालवाहतुक केली आहे.

मे 2021 मधे मालवाहतुक 114.8 मेट्रीक टन आहे. ती मे 2019 (104.6 मेट्रीक टन) पेक्षा 9.7% अधिक आहे.

रेल्वेने 2021मधे महत्वाच्या मालाची वाहतुक केली. यात 54.52 दशलक्ष टन कोळसा, 15.12 दशलक्ष टन लोहखनिज, 5.61 दशलक्ष टन अन्नधान्य, 3.68 दशलक्ष टन खते, 3.18 दशलक्ष टन क्षारयुक्त तेल, 5.36 दशलक्ष टन सिमेंट (क्लिंकर व्यतिरीक्त) आणि 4.2 दशलक्ष टन क्लिंकर यांचा समावेश होता.

भारतीय रेल्वेने मे 2021 मधे , मालवाहतुकीतून 11604.94 कोटी रुपये उत्पन्न कमावले.

विशेष म्हणजे मालवाहतुकीकडे ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी रेल्वेने मोठ्या प्रमाणावर सवलत आणि सूटही दिली आहे.

सध्याच्या मार्गावर मालवाहतुक करणाऱ्या गाड्यांचा वेगही वाढला हे नमूद करायला हवे.

गेल्या 18 महिन्यात मालवाहतुकीचा वेग दुप्पट झाला आहे. या वेगवाढीमुळी संबंधित घटकांच्या खर्चात बचत होत आहे.

@@AUTHORINFO_V1@@