लसीकरण नोंदणी पोर्टलवरील 'ती' अडचण दूर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-May-2021
Total Views |
                                                                                         
CORONA_1  H x W   
कल्याणच्या आर्ट गॅलरी लसीकरण केंद्रावर नोंदणीसाठी येत होत्या अडचणी
कल्याण : कोविन पोर्टलवरील तांत्रिक अडचण दूर झाल्याची माहिती कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासनामार्फत देण्यात आली. शनिवारी सकाळी ९ वाजून ४५ मिनिटांच्या सुमारास १८ ते ४४ वयोगटाचे लसीकरण नोंदणी पुन्हा सुरू करण्यात आल्याची माहिती महापालिका प्रशासनातर्फे देण्यात आली.
 
 
कल्याणच्या लाल चौकी आर्ट गॅलरी याठिकाणी १८ ते ४४ वयोगटासाठी लसीकरण सुरू आहे. कल्याण- डोंबिवली महापालिका प्रशासनाने शुक्रवारी रात्री आर्ट गॅलरी येथील लसीकरण सुरू राहणार असल्याचे सांगितले होते. सकाळी ६ वाजता ऑनलाईन 'स्लॉट बुकींग' केल्यावर मोबाईल फोनवर लसीकरणाचे ठिकाण, दिनांक व वेळ दर्शविणारा संदेश दाखवून सकाळी एक ते लससाठा उपलब्ध असेपर्यंत लसीकरण सुरू राहणार असल्याचे कळविले होते.
 
 
सकाळी मात्र नोंदणी न होत असल्यामुळे लोकांचा गोंधळ उडाला होता. अनेकांना लसीचा साठा उपलब्ध नाही त्यामूळे नोंदणी होत नसल्याचे वाटले. पालिकेने आठ वाजण्याच्या सुमारास नागरिकांच्या मनातील संभ्रम दूर केला. त्यामध्ये त्यांनी भारत सरकारने निर्धारित केलेल्या 'कोविन पोर्टल'वर शनिवारी सकाळपासून समस्या दिसून येत असल्यामुळे स्लॉट बुकींग होणार नाही असे सांगितले.
 
 
ऑनलाईन पध्दतीनेच स्लॉट बुक केलेस्या नागरिकांनाच लस देण्यात येईल असेही सांगण्यात आले. कोविन पोर्टलवरील तांत्रिक अडचण दूर झाल्याने सकाळी ९ .४५ मिनिटांपासून १८ ते ४४ वयोगटाचे लसीकरण बुकींग पुन्हा सुरू करण्यात आले अशी माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली.
 
 
गेल्या काही दिवसांत कोरोनाची रूग्णसंख्या वाढत असल्याने नागरिक लसीकरण केंद्राबाहेर मोठय़ा प्रमाणात गर्दी करीत आहेत. प्रशासनाकडून लसीकरण केंद्राबाहेर गर्दी करू नका असे आवाहान करण्यात आले आहे. १८ ते ४४ या वयोगटासाठी लसींचा साठा योग्य प्रमाणात उपलब्ध होत आहे. त्यामुळे सर्वाना लस मिळणार आहे. कुणीही लसीकरण केंद्रावर गर्दी करू नये असे आवाहन महापालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. अश्विनी पाटील यांनी केले आहे.
 
@@AUTHORINFO_V1@@