हवेतून कोरोना पसरतो : WHO देणार नव्या सूचना

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-May-2021
Total Views |

Covid_1  H x W:


कोरोना हवेतून पसरण्याचे दहा पुरावे

नवी दिल्ली : कोरोनाला महामारी घोषित केल्यानंतर आता जागतिक आरोग्य संघटना (WHO) आता याबद्दल नवी नियमावली जाहीर करणार आहे. कारण जागतिक आरोग्य संघटनेनेही मान्य केले आहे की, आता कोरोना विषाणू हा हवेतून पसरू शकतो. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, "विषाणू हा खराब व्हेंटीलेशन किंवा गर्दीच्या ठीकाणाहून पसरू शकतो. जिथे लोक बराच काळ वास्तव्य करतात. कारण थुंकींचे किंवा शिंकण्याचे फवारे हे एक मीटरहून दूरपर्यंत जाऊ शकतात.
 
 
 
दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना संदर्भातील अनेक समस्यांची उत्तरे देण्याचा प्रयत्न केला आहे. कोरोना हवेतून पसरतो का या प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्नही यात करण्यात आला आहे. कोरोना पासून कसे वाचायचे याबद्दल नवी मार्गदर्शक प्रणाली आता जाहीर केली जाणार आहे. कोरोना हवेतून पसरतो याबद्दलचे ठोस पुरावे आमच्याकडे नाहीत, असा वारंवार पूर्नरुच्चार जागतिक आरोग्य संघटना करत होती.
 
 
कोरोना कसा पसरतो ?
 
चीनमध्ये २०१९ या वर्षात ज्यावेळी महामारी पसरली तेव्हापासून या प्रश्नावर चर्चा होत आहे. दरम्यान, यामागे एक आणखी एक वाद आहे. वैज्ञानिकांमध्ये ड्रॉपलेट आणि एयरोसोल यावरून विसंगती आहे. बहुतांश वैज्ञानिक मानतात की, शिकणे, खोकणे, गाणे किंवा संवाद साधणे या प्रक्रीयांमध्ये नाक किंवा तोंडावाटे थुंकीचे जे थेंब निघतात त्याला ड्रॉपलेट म्हणतात. यांचे आकारमान पाच मायक्रोमीटर इतके असते. त्यात कोरोना विषाणू त्याच्या वजनाच्या तुलनेत दोन मीटरहून जास्त दूर जाऊ शकत नाही. गुरुत्वाकर्षणामुळे तो खाली पडून जातो त्यामुळे कोरोना हवेत जास्तवेळ उडू शकत नाही. एक माइक्रोमीटर एक मीटरचा १० लाखावा हिस्सा असतो. काही तज्ज्ञांच्या दुसऱ्या गटाचे म्हणणे आहे की, नाक आणि तोंडावाटे निघणाऱ्या कणांचा आकार हा पाच मायक्रोमीटरहून कमी असू शकतो. तो हवेपासून दूरपर्यंत जातो. त्यामुळे कोरोनाही यातून पसरू शकतो. जुलै २०२० मध्ये आरोग्य संघटनेने म्हटले होते की, कोरोना विषाणू हा हवेतून पसरत नाही.
 
 
कोरोना पसरण्याच्या सुरुवातीच्या काळात मास्क प्रत्येकाला बंधनकारक करण्यात आला नव्हता. केवळ कोरोनाबाधितानेच मास्क वापरावा असे म्हटले होते. जुलै २०२० मध्ये मात्र, तज्ज्ञांच्या एका गटाने कोरोना हवेत पसरत असल्याचे म्हटले होते. याबद्दल जागतिक आरोग्य संघटनेने घोषणा करावी, असे सांगण्यात आले होते. जागतिक आरोग्य संघटनेने मात्र, या शक्यतेला दुजोरा दिला नाही. कोरोना हवेतून पसरतो हे आरोग्य संघटनेने मान्य केले नाही. पण कोरोनाबाधित व्यक्तीशी संपर्कात आलेल्या वस्तूंचा वापर केल्यास विषाणू पसरू शकतो याबद्दल मत व्यक्त केले होते.
 
 
कोरोना बाधित व्यक्तीच्या तोंडावाटे किंवा नाकावाटे निघणारे ड्रॉपलेट्स म्हणजेच कण जर कपडे, भांडी आणि फर्नीचरवर उडाले तर विषाणू पसरू शकतो. एप्रिलमध्ये कोरोना हवेतून पसरतो हा वाद पुन्हा एकदा चर्चेत आला. यात प्रसिद्ध मेडिकल जर्नल असलेल्या द लॅसेटमध्ये १० पुरावे दाखवून सिद्ध करण्यात आले की कोरोना हवेतून पसरतो. त्यातच अमेरिकेतील MIT म्हणजेच 'मेसाचुसेट्स इंस्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी' या अभ्यासात दावा केला आहे की सहा फूटांचे अंतरही काही उपयोगाचे नाही. जर कोरोना बाधित व्यक्ती शिंकला आणि त्याच्या नाकावाटे निघालेले ड्रॉपलेट्स एअरोसोल बनले तर हा व्यक्ती सुपर स्प्रेडर ठरू शकतो. संशोधनात अमेरिका, चीन आणि कोरीयातही कोरोना पसरण्याच्या अनेक घटनांचा उल्लेख करण्यात आला आहे.
 
 
वैज्ञानिकांनी सादर केलेले १० पुरावे कोणते ?
 
मानवी व्यवहार, संभाषण करण्याच्या सवयी, घरांचे आकारमान, व्हेंटीलेशन आणि इतर घडामोडींच्या विश्लेषणातून ही गोष्ट समजते की ड्रॉपलेट्स आणि फोमिटीज म्हणजे कपडे, भांडी, फर्निचर आदी ठिकाणी उपलब्ध विषाणू इतक्या गतीने पसरत नाही.
 
 
विलगीकरण कक्षात असलेल्यांना बऱ्याचदा संक्रमणाचा धोका वाढला होता. विलगीकरणासाठी हॉटेल्समध्ये राहणाऱ्यांच्या संपर्कात आल्याने कर्मचाऱ्यांनाही कोरोना झाल्याच्या घटना आहेत.
 
 
कोरोनाचे ३३ टक्के ते ५९ टक्के प्रकरणे ही विनालक्षणे असलेल्या संक्रमित व्यक्तीकडून पसरू शकतो. कारण या व्यक्ती खोकत किंवा शिंकत नाहीत. हा देखील या गोष्टीचा पुरावा मानण्यात आला.
 
 
रुग्णालयात होणाऱ्या संसर्गाबद्दलही पुरावा देण्यात आला. पीपीई किट्स घालणाऱ्या आरोग्य कर्मचारी व डॉक्टरांनाही कोरोनाची बाधा झाली. पीपीई किट्स हे ड्रॉपलेट आणि एयरोसोलपासून बचाव व्हावा म्हणून विशेषरित्या तयार केले जातात. तरीही तज्ज्ञ सांगतात की लॅबमध्ये केलेल्या पडताळणीनुसार कोरोना तीन तास हवेत तरंगत राहू शकतो, असे सांगण्यात आले.
रुग्णालये आणि इमारतींच्या बाहेर लावण्यात आलेल्या एअर फिल्टर आणि डक्टमध्येही कोरोना विषाणू आढळला आहे. एयरोसोल शिवाय या भागात कोरोना विषाणू पोहोचत नाही.
 
 
पिंजऱ्यात बंद असलेल्या जागेवरही कोरोना विषाणू पोहोचू शकतो. त्यामुळे कोरोना पिंजऱ्यात पोहोचण्याचा मार्ग हा हवेतूनच जातो, असे या संशोधनात म्हटले होते.
 
 
मात्र, आत्तापर्यंत अशी कुठलीही थिअरी पुढे आलेली नाही ज्यात कोरोना विषाणू हवेतून पसरत नाही याला दुजोरा देऊ शकेल.
कोरोना पसरण्याचा दुसरा मार्ग म्हणजे नाक आणि तोंडावाटे निघणारे ड्रॉपलेट आणि फोमिटीज म्हणजे कपडे आणि भांडी व फर्निचर हे सिमीत सबूत आहेत.
 
 
कोरोना का पसरतो ? - जागतिक आरोग्य संघटनेने दिली तीन कारणं
 
 
सध्याचे पुरावे हे स्पष्ट करतात की, विषाणू प्रामुख्याने त्याच व्यक्तींमध्ये पसरतो जे एकमेकांशी निकट संपर्कात असतात. 1 मीटर किंवा त्याहून कमी अंतरावर असणाऱ्यांद्वारे कोरोना पसरू शकतो.
 
 
मोकळी हवा उपलब्ध नसलेली जागा किंवा बंद घर यातून कोरोना पसरू शकतो. जिथे माणसांचे वास्तव्य दीर्घकाळ असते त्या ठिकाणी एयरोसोलद्वारे हवा एक मीटरहून दूरपर्यंत जाऊ शकते.
 
 
एयरसोलद्वारे पडलेल्या कणांना जर कुणी स्पर्श केला तर विषाणू संक्रमणाचा धोका असतो. हात, नाक, तोंड किंवा डोळ्याला स्पर्श केला तर कोरोनाची लागण होऊ शकते.
 
 
आता जगभरात हे देखील मान्य करण्यात आले आहे की कोरोना विषाणू हा एक मीटर किंवा सहा फूट दूरवरूनही पसरू शकतो.
एयरोसोलद्वाके कोरोना विषाणू पसरण्याच्या या निष्कर्षानंतर आता नव्या मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या जाऊ शकतात.
शाळा, महाविद्यालये, घर, कार्यालये आणि मॉल्स यांसारख्या बंद जागांबद्दल नव्या मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या जाऊ शकतात.
 
  
भारतात कोविड-19 टास्क फोर्स प्रमुख डॉ. वीके पॉल यांनी घरात मास्क वापरण्याचा सल्ला दिला होता. जागतिक आरोग्य संघटनेच्या नव्या मार्गदर्शक सूचनांवरच आधारित आहे. कारण बंद जागेच कोरोना पसरू शकतो.
सोसायट्या, इमारती किंवा अपार्टमेंटमध्ये कोरोना पसरण्याची उदाहरणे याच कारणांमुळे आहे.
@@AUTHORINFO_V1@@