जाणून घ्या आपल्या लसींविषयी !

    दिनांक  07-May-2021 19:02:54
|
sputnik v_1  H
 
 
 'Sputnik V'
  
१. रशियाच्या पहिल्या उपग्रहावरून नामकरण.
 
२. पुतीन यांनी गेल्या वर्षी म्हटले होते की, ही लस अत्यंत प्रभावीपणे कार्य करते आणि चांगली रोगप्रतिकारशक्ती निर्माण करते. या लसीने सर्व आवश्यक चाचण्या उत्तीर्ण केल्यात, असंही त्यांनी सांगितलं. रशियातील कोरोना व्हायरस लस गमेलिया रिसर्च इन्स्टिट्यूट आणि रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने तयार केलीय.
 
३. 'Sputnik V '९१.६ टक्क्यांपर्यंत प्रभावी असल्याचा दावा केला जात आहे .
 
 

vaccine_1  H x
 
 
 Covishield 
 
 
१. भारत बायोटेक (Bharat Biotech) या कंपनीने आपल्या कोव्हॅक्सिन (Covaxin) या लशीच्या तिसऱ्या टप्प्यातल्या चाचण्यांचे (Clinical Trials) प्राथमिक निष्कर्ष बुधवारी (3 मार्च) जाहीर केले.
 
२.त्यात ही लस 81 टक्के प्रभावी असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही एक मार्च रोजी याच कोव्हॅक्सिन लशीचा पहिला डोस घेतला आहे.
 
३. कोविशिल्ड ही लस ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने अॅस्ट्राझेनेका या औषध कंपनीच्या सहयोगाने विकसित केली याच लशीपासून भारतात पुण्यातल्या सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (Serum Institute of India) या संस्थेने लस विकसित केली . ती भारतातही कोविशिल्ड याच नावाने ओळखली जाते .
 
 
 
 
bharat biotech_1 &nb
 
 
 
 covaxin
 
१. कोव्हॅक्सिन ही लस पूर्णतः भारतीय असून, ती हैदराबाद भारत बायोटेक या कंपनीने इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) आणि पुण्याच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी (NIV) या संस्थांच्या सहकार्याने विकसित केली आहे.
 
२. कोव्हॅक्सिन या लशीचा प्रभाव 80.6 टक्के असल्याचा निष्कर्ष निघाला.
 
३. भारतात सध्या असलेल्या लसीकरणाच्या नेटवर्कमध्ये लशींची साठवणूक 2 ते 8 अंश सेल्सिअसपर्यंतच्या तापमानात करण्याची व्यवस्था उपलब्ध आहे. त्या अनुषंगाने कोव्हॅक्सिनची साठवणूक करणं सोपं आहे. कोव्हॅक्सिन ही लस ओपन व्हॉयल पॉलिसीनुसार मिळते. म्हणजेच या लशीची बाटली उघडल्यानंतर तिचा वापर पुढच्या 25 ते 30 दिवसांत केला तरी चालतो. त्यामुळे वाया जाणाऱ्या लशीचं प्रमाण 10 ते 30 टक्क्यांपर्यंत कमी होईल. कोविशिल्ड लशीबाबत ही सुविधा उपलब्ध नाही. लशीची बाटली उघडल्यानंतर चार तासांच्या आत ती वापरणं गरजेचं आहे.
 
 
 
 
 
 
 
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.