पुदुच्चेरीच्या मुख्यमंत्रीपदी एन. रंगास्वामीजी

    दिनांक  07-May-2021 20:32:57
|ranga _1  H x Wशपथ घेतल्याबद्दल पंतप्रधानांनी केले अभिनंदनवृत्तसंस्था : एन. रंगास्वामीजी पुदुच्चेरीच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले आहेत. पुदुच्चेरी केंद्रशासित प्रदेश आहे. मात्र पुदुच्चेरीत स्वतंत्र विधिमंडळ आहे. तिथे 'रालोआ'चे सरकार निवडून आले असून एन. रंगास्वामीजी हे मुख्यमंत्री असतील.


केरळ, तामिळनाडु, पश्चिम बंगाल आणि आसाम सोबत पुदुच्चेरीच्या निवडणूकाही झाल्या होत्या. भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीने सर्वाधिक जागा घेतल्या.

ऑल इंडिया एन आर कोंग्रेस या पक्षाचे रंगास्वामी संस्थापक आहेत. ऑल इंडिया एन आर कोंग्रेस हा पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा घटकपक्ष आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीत भारतीय जनता पक्ष हा प्रमुख पक्ष आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एन. रंगास्वामीजी यांचे पुदुच्चेरीच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्याबद्दल अभिनंदन केले आहे.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.