विश्वेश्वर मंदिर दिसणार आता नवीन रूपात; मोदींचे स्वप्न होणार साकार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-May-2021
Total Views |

Vishveswar Tmple _1 
 
 
 
वाराणसी - दुसरीकडे लॉकडाऊनमुळे जग ठप्प झाले असताना ६५० कामगार दोन सत्रात विश्वेश्वर मंदिराचे काम ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्याच्या जिद्दीने कार्यरत आहेत. हळहळू मंदिराचे नवीन रूप समोर येत असून गुलाबी दगडांवर सुंदर असे नक्षीकाम उमटवण्याचे काम सुरू आहे. धाम क्षेत्रातील प्रत्येक भिंतीवर बालेश्वराची मुद्रा उमटताना आपल्याला दिसून येतंय.
 
 
काशीतील विश्वेश्वर मंदिराचे काम प्रगतीपथावर सुरू आहे. या मंदिराची निर्मिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न असून अशा मंदिराद्वारे ऐतिहासिक दस्तऐवज जगासमोर आणण्याचा त्यांचा मानस आहे. एवढेच नसून येथील मणिमाला मंदिराचा सुद्धा प्राचीन असा असणारा दस्तऐवज लवकरच जगासमोर येणार आहे. त्यासाठी पुरातत्व विभागातील तीन सदस्यांचा संघ कार्यरत आहे. या उपक्रमाअंतर्गत मंदिरांच्या प्राचीन इतिहासाची मिळालेली माहिती आणि विशेष बाबी प्रसिद्ध केल्या जातील. सोबतच या मंदिरांचा निर्मात्यांविषयीची माहितीही समोर येईल. या मंदिराच्या पुनः निर्मितीसाठी खरेदी केलेल्या ३०० भवनात ६० हून अधिक मोठे छोटे मंदिर मिळाले आहेत.
 
 
या कामासाठी ५.३ लाख चौ.किमी क्षेत्रामध्ये कारागीर आणि अभियंते दररोज धाम या क्षेत्राला आकार देत आहेत. एकूण २४ मंदिरांची योजना असून १९ इमारतींवर सध्या काम चालू आहे. मंदिर परिसर, मंदिर चौक, रीफ्रेशमेंट सेंटर, गेस्ट हाऊस, प्रवासी सुविधा केंद्र, संग्रहालय, अध्यात्म पुस्तक केंद्र, मुमुक्षु भवन रुग्णालयाचे काम सुरू झाले आहे. मंदिर चौकचा रस्ता 'c' या आकारात बांधला जात असून तेथून गंगा नदीचे सरळ दर्शन होईल. कार्यकारी अभियंता संजय गोरे म्हणाले की, "३४५.२७ करोड एवढा निधी या कामासाठी लागत आहे. ऑगस्ट २०२१ पर्यंत काम पूर्ण होण्याचा अंदाज आहे."
 
 
या क्षेत्रास भूकंपप्रवण तसेच भव्य बनवण्यासाठी बांधकाम करताना तांबे या धातूचा सुद्धा उपयोग केला जात आहे. सहा इंच रुंद व्ही-आकाराच्या आणि १८ इंच लांबीच्या पितळ प्लेट्समध्ये ६०० ग्रॅम वजनासह १२ इंचाची गुली जोडली जात आहे. गुलीचे वजन सुमारे ४०० ग्रॅम आहे. पितळ आणि दगडांमधील अंतर भरण्यासाठी खास प्रकारच्या केमिकल लॅपॅक्स अल्ट्राफिक्सचा वापर केला जात आहे. काशी विश्वनाथ धामच्या बांधकामानंतर दोन लाख लोक सहजपणे येऊ शकतील. जेथे यापूर्वी भाविकांना उभे राहण्यासाठी पाच हजार चौरस फूट जागादेखील नव्हती.
 
 
५.३ लाख क्षेत्रापैकी ७० टक्के जागा ही हिरवाईसाठी राखीव ठेवण्यात येणार आहे. काशीच्या मणिकर्णिका आणि ललिता घाटातून या क्षेत्राची सुरुवात होईल. ललिता घाटाचे प्रवेशद्वार धाममधील घाटाच्या बाजूने केले जाईल. त्याशिवाय सरस्वती गेट, नीलकंठ आणि धुंडीराज गेट येथूनही विश्वनाथ धाममध्ये प्रवेश करता येईल. मंदिर क्षेत्रात गर्भगृह शेजारील बैकुंठ मंदिर, तारकेश्वर आणि दंडपाणीसह राणी भवानी मंदिर असेल. याशिवाय गर्भगृह शेजारील बाकीचे देवतांचे मंदिर मुख्य आवार जवळ बांधले जातील. कॉम्प्लेक्सला ३४ फूट उंचीचे चार दरवाजे असतील. संपूर्ण कॉम्प्लेक्समध्ये मकराना आणि चुनार राहतील. कॅम्पस प्रकाशात चमकेल. येथे धार्मिक आणि आयुर्वेदिक महत्त्वची झाडे देखील असतील. कॉरिडॉरच्या बाहेरील भागात जालासेन टेरेस तयार केला जाईल. या गच्चीवर उभे असताना गंगा नदीसोबत मणिकर्णिका, जालसेन आणि ललिता घाट देखील दिसू शकतात.
@@AUTHORINFO_V1@@