कोरोनामुळे ६ कोटी ४० लाख महिलांच्या नोकऱ्या गेल्या

    दिनांक  05-May-2021 15:27:04
|
 
women jobs_1  H

 

वॉशिंग्टन : कोरोनामुळे जगभरातील महिलांवर गंभीर परिणाम झाला आहे. सर्वात जास्त नुकसान नोकरदार महिलावर्गाचे झाले आहे. महामारीच्या काळात  ६ लाख ४० कोटी महिलांना आपली नोकरी  गमवावी लागली. म्हणजेच  दर २० कमावत्या महिलांपैकी एका स्त्रियाला बेरोजगारीचा सामना करावा लागत आहे. कारण की, महिलांची संख्या जास्त असणाऱ्या नोकऱ्यांवर याचा परिणाम झाला. विक्री विभाग, उत्पादन विभाग अशा क्षेत्रातील ४० टक्के महिलांना याचा सामाना करावा लागला.
 
 
 
यातच शाळा आणि महाविद्यालये बंद असल्याने मुलांच्या जबाबदारीमुळे त्यांच्यावर तणाव वाढला आहे. यंदा  मुलांच्या संगोपनासाठी महिला ३१ तास काम करत होते. गतवर्षी हे प्रमाण २६ तास इतके होते. अहवालानुसार, महिलांच्या नोकरी जाण्याबद्दल एकच पॅटर्न दिसला होता. पुरुषांच्या तुलनेत महिलांचे रोजगार गमावण्याचे प्रमाण जास्त आहे.
 

यात कोलंबिया, कोस्टारिका, इक्वाडोर आणि चिली या देशात पुरुषांच्या तुलनेत नोकरी गमवण्याचे प्रमाण महिलांचे जास्त आहे. महिलांचा रोजगार जाण्यामध्ये पहिल्या १० देशांमध्ये अमेरिका, कॅनडा स्पेन आणि ब्राझील आदी देशांचाही सामावेश आहे. स्त्रियांची स्थिती सुधारण्याबाबत काही उपाय दिले गेले आहेत. डिजिटल साक्षरता, रोजगारात मदत,  योजना तयार करताना महिलांचा विचार बालसंगोपनालाही नोकरीचा दर्जा देणे आदी उपाय आहेत.
 

महिला सक्षमीकरणासाठी गुंतवणूक गरजेची
 

अहवालानुसार, स्त्री सक्षमीकरणासाठी केलेली गुंतवणूक समाजाचे राहणीमान उंचावू शकते. स्त्रीयांना आपण अर्थव्यवस्थेचा भाग बनवले नाही तर आपल्या विकास दरावर त्याचा परिणाम होऊ शकतो. 'ओईसीडी' देश जिथे महिलांचा रोजगार कमी झाल्याने त्यांचा विकासदर हा १५ टक्क्यांनी घसरला आहे.

 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.