अभिनेत्री कंगना रनौतचे ट्विटर अकाउंट सस्पेंड

04 May 2021 13:30:20
kangana ranaut _1 &n
 
मुंबई - अभिनेत्री कंगना रनौतचे ट्विटर अकाउंट सस्पेंड करण्यात आले आहे. पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणूकीच्या निकालानंतर सुरू असलेल्या हिंसाचाराबाबत कंगनाने ट्विट केले होते. हिंसाचारासाठी जबाबदार असणाऱ्या कारवाईची मागणी केल्यानंतर ट्विटरने कंगनाचे अकाउंट निलंबित केले आहे.
 
 
बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत हिने पश्चिम बंगालमध्ये सुरू असलेल्या हिंचाराबाबत ट्विट करुन आपला संताप व्यक्त केला होता. कंगनाने ट्विट करुन लिहिले होते की, “या हत्याकांडाला जबाबदार असणाऱ्या प्रत्येक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मिडियाचा धिक्कार असो. भारतीयांनो आठवण ठेवा, हा हिंदू राष्ट्रवादीचा मृत्यू नव्हे तर राष्ट्रवादाचा मृत्यू आहे." त्यानंतर आपल्या दुसर्‍या ट्वीटमध्ये कंगनाने एक भाजपा कार्यकर्त्याचा फोटो शेअर केला आहे. यावर तिने लिहिले की, "टीएमसीच्या गुंडांनी भाजप कार्यकर्त्यावर सामूहिक बलात्कार केला. इंदिरा गांधींनी ३९ वेळा आणीबाणी लागू केली आणि आंतरराष्ट्रीय माध्यमांना सांगितले की तुमच्या वाटण्याला भारत दुर्लक्ष करतो. या देहाती देशाला मोदींच्या प्रेमाची भाषा माहित नाही, त्यांना फक्त हिंसाचार माहित आहे."
 
 
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना टॅग करुन कंगना म्हणाली, “हा हत्याकांड थांबला पाहिजे. आतापर्यंत ३० लोक ठार झाले आहेत. अमित शहा कृपया आपल्या कार्यकर्त्यांना वाचवा. ते घरे, दुकाने, व्यवसाय आणि जीवन गमावत आहेत. कृपया त्यांची रक्षा करा." बंगालमधील विधानसभा निवडणुकांच्या निकालापासून तिथून हिंसाचाराच्या बातम्या येत आहेत. भाजपा प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांचे म्हणणे आहे की, निकालानंतर त्यांच्या पक्षाची सुमारे १०० कार्यालये आणि कामगारांची घरे उद्ध्वस्त केली गेली आणि काहींना जाळण्यात आले.

Powered By Sangraha 9.0