कसाबमध्ये माणूस शोधणाऱ्यांनी मुखपट्ट्या लावल्या का ?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-May-2021
Total Views |

bengal _1  H x


मुंबई :
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालानंतर भाजप कार्यकर्त्यांच्या हत्या झाल्याने तसेच अनेक भाजप कार्यकर्त्यांच्या घरावर हल्ले झाल्याने आता या हिंसाचाराचा देशभरातून निषेध व्यक्त करण्यात येत आहे. यावरूनच भाजप आमदार आशिष शेलार यांनी एरवी मानवतेच्या नावाने गळे काढणारे,सहिष्णुतेचे तथाकथित पुजारी,कसाबमध्ये सुध्दा माणूस शोधणाऱ्यांनी आता 'मुखपट्टया' लावल्या का? असा सवाल केला आहे.




ट्विट करत आशिष शेलार म्हणतात,"पश्चिम बंगालमध्ये दिदींनी विजयाचा उन्माद घालत,भाजपच्या कार्यकर्त्यांवर हल्ले, हत्या,घरांची,भाजपा कार्यालयांची जाळपोळ अशी हिंसाचाराची मालिका सुरु केली. एरवी मानवतेच्या नावाने गळे काढणारे,सहिष्णुतेचे तथाकथित पुजारी,कसाबमध्ये सुध्दा माणूस शोधणाऱ्यांनी आता "मुखपट्टया" लावल्या का?" असा सवाल आशिष शेलारांनी उपस्थित केला आहे.
दरम्यान, पश्चिम बंगालमधील निवडणुकीच्या निकालानंतर भाजप कार्यकर्त्यांवरील होत असलेल्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर पक्षाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा हे मंगळवारपासून दोन दिवसांच्या बंगालच्या दौऱ्यावर जात आहेत. हिंसाचारग्रस्त भाजप कार्यकर्त्ये आणि त्यांच्या नातलगांची भेट घेतील. गेल्या २४ तासांत टीएमसीच्या गुंडांनी बंगालमध्ये ९ कार्यकर्त्यांची हत्या केल्याचा आरोप विजयवर्गीय यांनी केला आहे. दरम्यान, जे.पी. नड्डा हे कोलकात्यात धरणे आंदोलनही करणार आहेत.


@@AUTHORINFO_V1@@