बंगालमधील अपयशावर काँग्रेसला 'या' महत्त्वाच्या नेत्याकडून घरचा आहेर

04 May 2021 19:45:49
congress_1  H x
 
 
कोलकत्ता - पश्चिम बंगालमधील निवडणुकीमध्ये काॅंग्रेसचा सुपडा साफ झाला आहे. यापार्श्वभूमीवर राहुल गांधी भाजपचा पराभव केल्यामुळे ममता बॅनर्जींचे अभिनंदन करत असल, तरी पश्चिम बंगालमधील स्थानिक काँग्रेस नेते नाराज आहेत. पश्चिम बंगालमधील काॅंग्रेस नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते अधीर रंजन चौधरी यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
 
 
 
 
पश्चिम बंगालमध्ये भाजपने ३ जागांवरुन ७७ जागांवर उडी मारली. मात्र, २०१६ च्या निवडणूकीमध्ये ४४ जागा जिंकलेल्या काॅंग्रेस पक्षाला यंदा एकही जागा निवडणून आणता आली नाही. याबाबत पक्षाचे पश्चिम बंगालमधील नेते अधीर रंजन चौधरी यांनी नाराजी व्यक्त केली आहे. सर्व मुस्लिम मते तृणमुलच्या खात्यात गेली, त्यामुळे पक्ष हरल्याचे चौधरी म्हणाले आहेत. या निवडणुकीमध्ये काॅंग्रेसने डावे आणि मौलाना अब्बास अली यांच्या आयएसएफशी युती केली. अधीर रंजन म्हणाले की, आतापर्यंत काॅंग्रेसला प्रामुख्याने मुस्लिम मते मिळत होती. ते म्हणाले की जेव्हा हिंदू मते भाजपकडे गेली आणि मुस्लिम मते ममतांकडे, तेव्हा आमच्याकडे काहीही राहिले नाही. या निवडणुकीमध्ये जनतेला काही कार्यक्रम आणि आश्वासने देण्यात काँग्रेस अपयशी ठरली हे त्यांनी कबूल केले. ते म्हणाले की, हा एवढा वाईट पराभव आहे की भविष्यासाठी आपल्याकडे काही योजना नाही.
 
 
 
ते म्हणाले की, तृणमुलला आपली सत्ता कायम राखण्याची इच्छा होती, तर भाजपने सरकार स्थापनेसाठी आपली पूर्ण ताकद पणाला लावली होती. अशा वेळी काॅंग्रेस केवळ अस्तित्वासाठी लढत होती. भाजपने मतांचे ध्रुवीकरण केल्याचा आरोप करत ते म्हणाले की, भाजपने यात कसलाही कसर सोडली नाही. परंतु ते यशस्वी होऊ शकली नाहीत. ते म्हणाले की, मालदा आणि मुर्शिदाबादसारख्या भागात मुस्लिम ध्रुवीकरण झाले आहे.

Powered By Sangraha 9.0