बंगालमधील हिंसाचाराविरोधात याचिका दाखल करणार: इंडिक कलेक्टिव्ह

04 May 2021 01:34:33

nnnn_1  H x W:




केंद्रीय सुरक्षादलांना तैनात करण्याचे आदेश देण्याविषयी विनंती करण्यासाठी सामाजिक संस्थेची सर्वोच्च न्यायालयात धाव


प्रतिनिधी : बंगालमध्ये ममता बॅनर्जींच्या 'टीएमसी'ला बहुमत मिळाल्याच्या दुसऱ्याच दिवशी मोठ्या प्रमाणावर राजकीय हिंसाचार सुरु झाला आहे. अनेक भाजप कार्यकर्ते, समर्थकांवर हल्ले केले जात आहेत. त्याविरोधात आता चेन्नईस्थित 'इंडिक कलेक्टिव्ह' ही सामाजिक संस्था सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचे समजते.

विधानसभा निवडणूक निकालाच्या दुसऱ्याच दिवशी 'टीएमसी'च्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर हिंसाचार झाल्याचे चित्र आहे. भाजपच्या अंदाजे 28 कार्यकर्ता-समर्थकांचे खून झाल्याची माहिती समोर येते. भाजप समर्थक महिलांना मारहाण केली जात आहे. याविषयीच्या बातम्या मुख्यप्रवाहातून समोर आलेल्या नसल्या तरी सोशल मिडियाच्या माध्यमातून संध्याकाळी उशिरा अनेक व्हिडीओ समोर आले आहेत. 'टीएमसी'चे समर्थक विजय मिरवणुका काढताना रस्त्यातील भाजप समर्थकांच्या घर-मालमत्तेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान करीत आहेत.

दरम्यान पश्चिम बंगालच्या राज्यपालांनी राज्याचे पोलीस महासंचालक आणि मुख्य सचिवांना दोनदा भेटीसाठी बोलावले होते.

राजकीय हिंसाचार थांबविण्यासाठी केंद्रीय सुरक्षा दलांना तैनात करावे, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करणार असल्याची माहिती 'इंडिक कलेक्टिव्ह' या संस्थेने रात्री उशिरा दिली. बंगालमधील हिंसाचाराचे चित्र पाहून हा निर्णय घेण्यात आला असल्याचे 'इंडिक कलेक्टिव्ह'ने म्हटले आहे.

'इंडिक कलेक्टिव्ह' ही संस्था चेन्नईची असून कायदेशीर हक्कांसाठी न्यायालयीन मार्गाने लढणारी एक सामाजिक संस्था आहे.
Powered By Sangraha 9.0