फुटले आयपीएलचे बबल ! कोरोनामुळे आयपीएल २०२१ स्थगित

04 May 2021 14:48:48

IPL 2021_1  H x 
 

कोरोनाने बायोबबलचे संरक्षण भेदत केला आयपीएल २०२१मध्ये शिरकाव

मुंबई : कोरोनाचे देशभर चालू असलेले तांडव पाहता आयपीएलच्या आयोजनावर एक खूप प्रश्न विचारले जात होते. त्यानंतर, आयपीएलचे सर्वात सुरक्षित मानल्या जाणाऱ्या बायोबबलचे संरक्षण भेदत कोरोनाने शिरकाव केला. यामुळे आता आयपीएल २०२१चे सामने अनिश्चित काळासाठी स्थगित केल्याची माहिती बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी एका वृत्तसंस्थेला दिली. सोमवारी केकेआर आणि सीएसकेचे खेळाडू आणि ३ सदस्य कोरोनाबाधित आढळल्याचे समोर आल्यानंतर सगळीकडे आयपीएल रद्द होते का? यावर चर्चा सुरु झाली. त्यानंतर मंगळवारी दिल्लीकॅपिटल्सचा अमित मिश्रा आणि सनरायझर्स हैद्राबादचा वृद्धिमान सहा हेदेखील कोरोनाबाधित आढळून आले आहेत. अखेर खेळाडूंच्या सुरक्षेसाठी उर्वरित सर्व सामने स्थगित करण्याचा निर्णय आता बीसीसीआयने घेतल्याचे समोर येत आहे.
 
 
 
बीसीसीआयने दिलेलेया माहितीनुसार, स्पर्धा तूर्तास स्थगित करण्यात आली असून पुढील काळात त्यासाठीच्या नव्या तारखा जाहीर होऊ शकतात. पण, सध्या प्राधान्य हे खेळाडू, स्टाफ आणि त्यांच्या आरोग्यालाच देण्यात येणार आहे. खेळाडूंच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड केली जाणार नसून यंदाच्या स्पर्धेत सहभागी सर्व खेळाडू आणि इतरही सदस्यांचीही पूर्ण जबाबदारी आम्ही घेत आहोत, असे प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकात सांगितले आहे. गेल्या २ दिवसांमध्ये ३ सदस्य आणि ५ खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्याचे समोर येत आहे. यामध्ये केकेआरचा वरुण चक्रवर्ती आणि संदीप वॉरियर यांना कोरोनाची लागण झाली होती. यांच्याव्यतिरिक्त किंग्स इलेवन पंजाबमधील एका खेळाडूला लागण झाल्याचे सांगण्यात येत आहे.
 
Powered By Sangraha 9.0