पुनावाला यांची ब्रिटनमध्ये लसनिर्मिती क्षेत्रात २४४८ कोटींची गुंतवणूक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-May-2021
Total Views |

poonawala_1  H


कोरोनाची लस बनविणारी जगातील सर्वात मोठी कंपनी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने (एसआयआय) यूकेमध्ये २४४८ कोटी रुपये गुंतविण्याचा निर्णय घेतला आहे. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन यांच्या कार्यालयाने याबाबत सोमवारी घोषणा केली. जॉन्सनच्या कार्यालयाच्यावतीने असे म्हटले गेले की, 'सीरम संस्थेने यूकेमध्ये २४० दशलक्ष पौंड (सुमारे २४४८ कोटी रुपये) गुंतविण्याचा निर्णय घेतला हे आनंददायक आहे. या प्रकल्पांतर्गत, यूकेमधील विक्री कार्यालये, क्लिनिकल चाचण्या, संशोधन आणि विकास यांद्वारेही लस तयार होण्याची शक्यता आहे.' या शब्दांत ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या कार्यालयाने पुनावाला यांच्या निर्णयाचे स्वागत केले.



भारतातून आपल्याला धमक्या तसेच लस मिळाव्या यासाठी अनेक राज्य सरकारांचा दबाव



सीरम इन्स्टिट्यूटही पुणेस्थित स्वदेशी लसनिर्मिती करणारी भारतातील एक महत्वपूर्ण कंपनी ठरली. मात्र या कंपनीचे सीइओ आदर पुनावाला हे मागील काही दिवसांपासून चर्चेत आहे. पूनावाला यांच्या कंपनीन आतापर्यंत बनविलेल्या बहुतांश लस भारत सरकारला दिल्या आहेत. आंतरराष्ट्रीय कराराचा भंग करून त्यांनी भारताला मदत केलीय. याबद्दल खरतर प्रत्येक भारतीयाने पूनावाला यांच्याप्रती कृतज्ञतेची भावना ठेवली पाहिजे मात्र याउलट 'टाइम्स ऑफ लंडन'ला दिलेल्या मुलाखतीत पूनावाला म्हणाले की, लसीच्या पुरवठ्याबाबत भारतातील राजकारणी आणि व्यापारी नेते त्यांना धमकावित आहेत. ज्यामुळे पुनावाला हे परिवारासह लंडनला निघून गेले. सोमवारी ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जोन्सन यांनी दिलेल्या माहितीनुसार पुनावाला यांनी लंडनमध्ये लसनिर्मिती क्षेत्रात २४४८ कोटींची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतलाय. मागील काही दिवसात सुरु असणाऱ्या चर्चा आणि आरोप-प्रत्यारोप यावर पुनावाला यांनी दिलेले स्पष्टीकरण हाच विषय आजच्या लाईव्हमधून समजावून घेऊया.


 
लसीकरण मोहिमेला वेग मिळावा म्हणून केंद्राकडून १०० टक्के आगाऊ रक्कम सिरमला

भारत सरकारने लसीकरण मोहिमेला वेग मिळावा म्हणून १०० टक्के आगाऊ रक्कम देत कंपनीची उत्पादन क्षमता वाढविण्यासाठी हातभार लावला. कोरोनावरील भारताच्या लढ्याला वेग मिळावा आणि लसीचा पुरवठा वाढावा यासाठी केंद्राने ही महत्वपूर्ण पावले उचलली आहेत याचा परिणामही लवकरच दिसून येईल. पूनावाला यांनी स्वतः ट्वीट करत ही माहिती दिली. तसेच सर्व भारतीयांचे लसीकरण व्हावे यासाठी कटिबद्ध असल्याचेही त्यांनी म्हंटले आहे. मात्र पूनावाला यांनी भारतातील काही सर्वात शक्तिशाली लोक फोन करून लस मिळावी यासाठी धमकी दिली जात आहे.  यामध्ये अनेक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांकडूनही दबाव निर्माण केला जात असल्याचे आदर पुनावाला म्हणाले आहेत. हे असे काही होऊ शकते, याची जाणीव केंद्र सरकारला असावी. त्यामुळेच की काय पुनावाला यांना केंद्र सरकारने ‘वाय’ दर्जाची सुरक्षा दिली. पण, या सगळ्या पार्श्वभूमीवर सध्या अदर त्यांच्या कुटुंबीयांसह लंडनमध्ये दाखल झाले. आपल्याला त्या भयंकर परिस्थितीमध्ये पुन्हा लवकर जायचे नाही, असेही त्यांनी सांगितले. यावरुन हाच प्रश्न उपस्थित होतो की, अदर यांना कोणी धमकावले असेल? या मुलाखतींनंतर इंडिया टुडेचे न्यूज डायरेक्टर राहुल कंवल यांनी शिवसेना नेत्यांनी ही धमकी दिल्याचा दावाही केला. मात्र, शिवसेनेने तीव्र नाराजी व्यक्त केल्यानंतर कंवल यांनी आपले म्हणणे मागे घेतले आणि याप्रकरणी दिलगिरी व्यक्त केली. कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करण्यासाठी नेहमीच भारतीय उद्योजकांवर निशाणा साधतात. अदानी-अंबानी यांच्यानंतर राहुल गांधींनी भारतीय लस उत्पादक इंडिया बायोटेकच्या स्वदेशी 'कोवाक्सिन'बाबत गोंधळ निर्माण केला, पुनावाला यांना मोदींचे मित्र ठरवत मोदी केवळ आपल्या मित्रांचे हित पाहत आहे असे आरोपही राहुल गांधींनी केले होते.

भारतीयांनी सीरम इन्स्टिट्यूट  आणि आदर पुनावाला यांच्याबाबत कृतज्ञ असावे


आज देशातील ज्या नागरिकांना लसीचा पहिला डोस मिळाला असेल तर जगातील सर्वात मोठी लस कंपनी सीरमसह भारत बायोटेकचेही मोठे योगदान आहे. पूनावाला यांच्या कंपनीने आतापर्यंत बनविलेले बहुतेक लस भारत सरकारला दिली आहे. आंतरराष्ट्रीय कराराचा भंग करून त्यांनी भारतीयांना मदत केली, ज्यासाठी त्याच्या कंपनीला कायदेशीर नोटीसही मिळाली आहे. याबद्दल आपण पूनावाला यांचे भारतीयांनी आभारी असले पाहिजे. याद्वारे, जर त्यांना भारतात कोणतीही समस्या येत असेल यावर योग्य चर्चा होण्याची आवश्यकता आहे. आज संकटामुळे कंपनीच्या काळात ही कंपनी आपल्यासाठी राष्ट्रीय रत्नांसारखी आहे. त्यानुसार त्यांचा आदर केला पाहिजे. धमकी देणाऱ्यांनी आणि सर्वच भारतीयांनी हे लक्षात ठेवले पाहिजे की जेव्हा आपण कोरोनाविरूद्ध लढा जिंकू तर पूनावाला आणि त्यांच्या कंपनीचे यात महत्त्वपूर्ण योगदान असेल.
@@AUTHORINFO_V1@@