शेरणी येतेय... विद्या बालनचा नवा चित्रपट

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    31-May-2021
Total Views |

Sherni_1  H x W
 
 
मुंबई : अभिनेत्री विद्या बालनचा बहुप्रतीक्षित 'शेरनी' चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला. हा चित्रपट अॅमेझॉन प्राईम व्हिडीओवर प्रदर्शित करण्यात येणार आहे. तसेच, या चित्रपटाचा ट्रेलर हा २ जूनला येणार आहे. टी-सीरीज आणि अबुदंतिया एंटरटेनमेंटद्वारे निर्मित, या अॅमेझॉन ओरिजिनल चित्रपटाचे दिग्दर्शन राष्ट्रीय पुरस्कार विजेता अमित मसुरकर याने केले आहे. या दिग्दर्शकाने 'न्यूटन'सारख्या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते.
 
 
 
 
 
 
 
सोशल मी़डियावर विद्याच्या शेरनीचा टीझर प्रदर्शित झाला आहे. शेरनी या चित्रपटामध्ये विद्याने एका फॉरेस्ट अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे. शेरनी ही एक काल्पनिक कथा आहे. मानव आणि प्राणी यांच्यातील संघर्ष या चित्रपटाच्या माध्यमातून मांडला जाणार आहे. यापूर्वी विद्याचा शकुंतला देवी हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यालाही प्रेक्षकांकडून संमिश्र प्रतिक्रिया मिळाल्या असल्या तरीही विद्या बालनच्या अभिनयाचे कौतुक केले गेले होते.
 
 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@