‘टार्झन’ अभिनेता जो लाराचा अपघाती मृत्यू

    दिनांक  31-May-2021 21:55:06
|

Tarzan_1  H x W
 
मुंबई : ९०च्या दशकात म्हणजेच १९९०मध्ये ‘टार्झन’ ही इंग्रजी मालिका प्रचंड गाजली होती. यावेळी ‘टार्झन’ची मुख्य भूमिका साकारणारे विल्यम जोसेफ लारा हे प्रसिद्धीझोतात आले होते. नुकतेच, एका विमान अपघातात त्यांचे निधन झाल्याची बातमी समोर आली आहे. शनिवारी २८ मे रोजी हा अपघात झाला. ५८ वर्षीय विल्यम जोसेफ लारा यांच्यासमवेत आणखी ७ जणांचा या अपघातात मृत्यू झाला. ज्यामध्ये त्यांची पत्नी ग्वेन लारा यांचादेखील समावेश आहे.
 
इंग्रजी प्रसिद्धी माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, जो लारा हे कुटुंबीयांसोबत एका खाजगी विमानाने प्रवास करत होते. विमानात काही तांत्रिक बिघाड झाल्यामुळे नॅशविलेमधील टेनेसी नदीत त्यांचे विमान कोसळले. सध्या पोलिस या प्रकरणाची चौकशी करत आहेत. या अपघातात विमानाचा चक्काचूर झाला आहे. मात्र कोणाचाही मृतदेह अद्याप सापडलेला नाही. काऊंटीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, सात लोकांची ओळख पटली आहे. ब्रैंडन हन्ना, ग्वेन एस लारा, जो लारा, डेविड एल मार्टिन, जेनिफर जे मार्टिन, जेसिका वॉल्टर्स आणि जॉनाथन वाल्टर्स अशी त्यांची नावे आहेत.
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.