शिवसेना कार्यकर्ता सुनेवर थुंकला!, व्हीडिओसह पोलीसांत तक्रार

    दिनांक  30-May-2021 19:03:59
|

Kalyan 1 _1  H

सुनेनं पोलीसांत जाऊन या अत्याचाराविरोधात तक्रार दाखल

कल्याण : कल्याण ग्रामीणचे माजी शिवसेना तालुका प्रमुख विद्यमान विधानसभा संघटक याने त्यांच्या सूनेच्या तोंडावर थुंकण्याचा प्रकार केला आहे. तसेच सूनेला मारहाण आणि शिवीगाळ केल्याचा प्रकार उघड झाला आहे. या घटनेविषयी सुरूवातीला शिवसेनेच्या नेतेमंडळीना सांगण्याचा प्रयत्न केला असता कुणीची सूनेचे म्हणणे ऐकून घेतले नाही. सरतेशेवटी या घटनेचा व्हिडीओ क्लिप घेऊन सूनेने भाजप आमदार रविंद्र चव्हाण यांच्या सोबत पोलिस उपायुक्तांची भेट घेतली. त्यांनी सास:यांच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी केली आहे.
 
 
कल्याण ग्रामीण परिसरातील भोपर या गावात संबंधित महिला राहतात. शिवसेना पदाधिकारी एकनाथ पाटील यांच्या त्या सूनबाई आहेत. सासरे वारंवार सुनेला त्रास देत होते. मारहाण आणि शिवीगाळ करत होते. केवळ त्रास देण्यापर्यंत हा प्रकार थांबला नाही तर त्यांच्या मुलींच्या अंगावरही धावून जाण्याचा प्रकार एकनाथ पाटील करत होता. धक्कादायक म्हणजे पाटील याने सुनेच्या तोंडावर थुंकल्याचा व्हीडिओ पोलीसांना तक्रारीवेळी दाखवण्यात आला आहे. आमदार रविंद्र चव्हाण यांनी या प्रकरणी पोलीस उपायुक्तांकडे धाव घेतली आहे.
 
 
चव्हाण यांनी भाजपाच्या माजी नगरसेविका रविना माळी यांच्यासह पीडित सुनेने पोलिस उपायुक्तांकडे जाऊन तक्रार दिली आहे. सुनेनं त्यांच्याकडे न्यायाची मागणी केली आहे. पुराव्यासाठी सासऱ्याचा व्हीडिओही सादर केला आहे. या व्हीडिओची सत्यता पडताळून चौकशी केली जाईल, असे आश्वासन पोलीसांनी दिले आहे.
 
 
तो व्हीडिओ तीन वर्षांपूर्वीचा !
 
एकनाथ पाटील यांच्याशी या प्रकरणी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी सून ज्या व्हिडीओ बाबत सांगत आहे. तो व्हिडीओ तीन वर्षापूर्वीचा आहे. आता आमच्यात कोणताही वाद नाही. भाजपचे पदाधिकारी हे आमच्या घरगुती वादाचा फायदा घेत आहेत. हा माझ्या बदनामीचा डाव आहे, असे ते म्हणाले.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.