भाजप आमदार आयलानी यांच्या वाहनावर हल्ला

    दिनांक  30-May-2021 20:14:22
|

ayalani car _1  


उल्हासनगर : उल्हासनगर विधानसभेचे आमदार कुमार आयलानी यांच्या वाहनावर शनिवारी रात्री उशीरा हल्ला झाला. यात त्यांच्या वाहनाचे नुकसान झाले. शनिवारी रात्री १० वाजता भाजप आमदार कुमार आयलानी यांचे पुत्र धीरज आयलानी त्यांचे वाहनाने उल्हासनगर महापालिकेच्या मागील बाजूस आंबे स्पोर्टक्लब जवळ उभे होते.


एका तरुणाने दगडाने त्यांच्या वाहनावर हल्ला केला. या प्रकारात धीरज आयलानी थोडक्यात बचावले असून त्यांच्या वाहनाचे नुकसान झाले आहे. या प्रकरणाची माहिती मिळताच मध्यवर्ती पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत गुन्हा दाखल केला आहे. या हल्ल्याबाबत अधिक तपास पोलीस करत आहेत.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.