संघनिष्ठ गिरीधारी बुचडे...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-May-2021
Total Views |

RSS  _1  H x W:


गिरीधारी बुचडे यांचे कोरोनामुळे वयाच्या ५२ वर्षी कोरोनामुळे निधन झाले. मंगळवारी १३ एप्रिल रोजी रात्री आठ वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. संघाचा उत्सव संपला व थोड्या वेळाने सुधीरचा फोन आला गिरीधारी गेले म्हणुन. तीव्र दुःख झाले खरेतर रडूच आले. आम्ही अनेक वर्षे संघात सहकारी म्हणून एकत्र काम केले.
 
 
 
पुण्यातील मनोहर मंगल कार्यालयासमोरील वस्तीत त्याचे बालपण गेले. सर्व वस्ती विभागात असते तसेच वातावरण दारूचे धंदे, गुंडगिरी इत्यादी... पण गिरीधारी लहानपणापासून शाखेत जात असे. संघाच्या संस्कारामुळे गिरी या सर्वांपासून दूर राहिला. शालेय शिक्षण पूर्ण केले. तो दररोज न चुकता संघ शाखेत जात असे.
 
 
आनंदी स्वभाव मित्र जोडण्याची कला व आवड, चांगले संघटन कौशल्य. संघाच्या निरनिराळ्या जबाबदाऱ्या स्वीकारून संघाचे काम केले. हे सर्व करत संघाचे तृतीय वर्ष पूर्ण केले. पुण्यातील संभाजी भागाचा कार्यवाही म्हणून पण चांगले काम काम केले. शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर जनता सहकारी बँकेत शिपाई म्हणून नोकरीची सुरवात केली.
 
 
 
बँकेतील व्यवहारांचा अभ्यास केला. मग बँकेच्या परीक्षा दिल्या व लेखनिक म्हणून काम केले. पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण केले व स्वबळावर अधिकारी पद प्राप्त केले. बँक सुटली की संघकाम. संघाच्या कामाचा सातत्याने ध्यास व संघकामाची तळमळ, कुटूंबावरही त्याने खूप प्रेम केले. त्याच्या मागे पत्नी व मुलगा व मुलगी आहे. संघ कामाची चांगली जाण, ध्यास व तळमळ असलेला कार्यकर्ता अकाली गेल्याचे तीव्र दुःख पुणे शहरातील सर्व संघ परिवारातील कार्यकर्त्यांना आहे. ईश्वर त्याच्या आत्म्यास शांती देवो व त्यांचे कुटुंबीयांस दुःख सहन करण्याची शक्ती देवो.
 
 
- दत्तात्रय अग्निहोत्री, पुणे.
@@AUTHORINFO_V1@@