देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 'भाजप ठाणे शहर - प्लाझ्मा हेल्पलाईन'चे अनावरण!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-May-2021
Total Views |

Thane_1  H x W:
 
ठाणे : भारतीय जनता पक्षातर्फे ठाणे शहरातील कोरोना रुग्णांसाठी एका ऑनलाईन प्लाझ्मा हेल्पलाईनची निर्मिती करण्यात आली आहे. या हेल्पलाइनचे अनावरण सोमवारी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. ठाणे शहर अध्यक्ष आमदार निरंजन डावखरे आणि युवा मोर्चा महाराष्ट्र उपाध्यक्ष मयुरेश जोशी यांच्या संकल्पेतून ही हेल्पलाइन सुरू करण्यात आली आहे.
 
 
 
 
 
"ठाणे शहरातील कोरोना रुग्णांच्या नातेवइकांची औषधे, बेड व प्लाझ्मासाठी प्रचंड धावपळ होताना दिसत आहे. यावर आता या प्लाझ्मा हेल्पलाइनमुळे बऱ्यापैकी मदत मिळणार आहे. हे हेल्पलाईन पोर्टल ड्युअल मोड पद्धतीने चालणार आहे. ज्यांना प्लाझ्माची गरज आहे त्यांना प्लास्मा मिळेल. तसेच, ज्यांना प्लास्मा दान करायचे आहे, त्यांना तेही करता येईल. यासाठी कोरोना आजारातून बरे झालेल्या ठाणे शहरातील रुग्णांना संपर्क करण्याचे काम बॅक ऑफिसला सुरूदेखील झाले आहे. उद्यापासून दररोज २० याप्रमाणे महिन्याभरात किमान ६०० रुग्णांना आमच्या हेल्पलाइन मार्फत प्लाझ्मा उपलब्ध होईल." असे यावेळी मयुरेश जोशी यांनी सांगितले.
 
 
 
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या www.bjpthane4plasma.co.in या हेल्पलाइनचे कौतुक केले. तसेच, कोरोनातून बरे झालेल्या ठाणेकरांनी या हेल्पलाईनच्या माध्यमातून अधिकाधिक प्लाझ्मा दान करुन गरजू रुग्णांना मदत करावी, असे आवाहन देखील केले. यावेळी मयुरेश जोशी यांच्या सह महापालिकेतील गटनेते मनोहर डुंबरे, महामंत्री विलास साठे, युवा मोर्चाचे समर्थ नायक इ. पदाधिकारी उपस्थित होते.
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@