कोरोनाकाळात बुद्धांची करुणा आमच्यासोबत : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

26 May 2021 14:52:48

rajbhavan_1  H



मुंबई :
कोरोना च्या संकटकाळात भगवान बुद्धांची करुणा आमच्या सोबत आहे. सर्वांनी करुणा आपल्या मनी बाळगावी असे आवाहन महाराष्ट्र् राज्याचे राज्यपाल महामहिम भगतसिंह कोश्यारी यांनी केले. रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी आज बौद्ध पौर्णिमेनिमित्त राज भवन येथे राज्यपाल यांची भेट घेऊन सुंदर बुद्ध मूर्ती सप्रेम भेट दिली.


शांती शिवाय विकास नाही. भगवान बुद्धांचा धम्म हा समतेवर आधारित आहे. शांती अहिंसा करुणा या तत्वांवर आधारलेला बौद्ध धम्म संपूर्ण जगात प्रसारित झाला आहे. महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला जगात सर्वश्रेष्ठ असा बौद्ध धम्म दिला याचा आम्हाला अभिमान आहे असे प्रतिपादन यावेळी ना रामदास आठवले यांनी केले.

रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (आठवले) राष्ट्रीय अध्यक्ष तसेच केंद्रीय सामाजिक न्याय व आधिकारिता राज्यमंत्री भारत सरकार मा.ना.रामदासजी आठवले साहेब अाज २६ मे २०२१ रोजी सकाळी ११:०० वाजता विश्वशांती दुत, तथागत गौतम बुध्द यांच्या २५६४ व्या जयंती निमित्ताने महाराष्ट्र राज्याचे महामहिम राज्यपाल मा.भगतसिंगजी कोश्यारी यांची राजभवन येथे शुभेच्छा भेट घेण्यात आली. ना.रामदासजी आठवले यांच्या वतीने बुध्दांची मूर्ती भेट देण्यात अाली. या प्रसंगी बौध्द धर्मगुरु भिक्खुंना चिवरदान करण्यात आले. यावेळी भन्ते विररत्न, भन्ते कश्यप, मा.कल्पना सरोज, मा.आशिष देशपाडे, मा.घनश्याम चिरणकर, मा.प्रविण मोरे अाणि मा.महेश लंकेश्वर उपस्थित होते.
Powered By Sangraha 9.0