सुप्रसिद्ध वगसम्राज्ञी कांताबाई सातारकर यांचे निधन

25 May 2021 18:28:23

Kantabai Satarkar_1 
 
संगमनेर : ज्येष्ठ तमाशा कलावंत, वगसम्राज्ञी कांताबाई सातारकर यांचे संगमनेर येथे वयाच्या ८२व्या वर्षयी निधन झाले. ज्येष्ठ तमाशा कलावंत रघुवीर खेडकर यांच्या त्या आई आहेत. महाराष्ट्राच्या मातीतील लोककला जपणार्‍यांमध्ये त्यांचे मोठे नाव आहे. काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली होती. दरम्यान, रघुवीर खेडकर यांच्यासह कुटुंबातील इतर सदस्य पॉझिटिव्ह आढळले होते. त्यातील काही जणांना सोमवारी घरी सोडण्यात आले.
 
 
 
२००५मध्ये महाराष्ट्र शासनाने तमाशा क्षेत्रातील योगदानासाठीचा पहिला विठाबाई नारायणगावकर जीवन गौरव पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला होता. दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धाप्रसंगी कांताबाई आणि रघुवीर यांना तमाशा सदर करण्याचा बहुमान मिळाला आहे.
 
Powered By Sangraha 9.0