अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या वडिलांवर चाकूहल्ला ; आरोपी अटकेत

25 May 2021 19:27:22

Sonali Kulkarni_1 &n
पुणे : नुकतेच मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचे दुबईमध्ये कुणाल बेनोडेकरसोबत लग्न केले. सोशल मीडियावर पोस्ट करून तिने काही दिवसांपूर्वी ही बातमी सर्वांना दिली होती. या बातमीमुळे कुटुंबात आनंदी वातावरण असतानाच दुसरीकडे तिच्या पुण्यातील घरी एका चोरट्याने तिच्या वडिलांवर चाकूहल्ला केला. या हल्ल्यात तिचे वडील मनोहर कुलकर्णी हे जखमी झाले असून याप्रकरणी २४ वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली आहे.
 
 
 
मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचे पुण्यातील निगडी भागात सेक्टर क्रमांक २५मध्ये घर आहे. लग्नानंतर सोनाली ही दुबईत अडकली असून तिचे आईवडील सध्या या घरात राहतात. या चोरट्यासोबत झालेल्या झटपटीत तिचे वडील किरकोळ जखमी झाले आहेत. मात्र, एकूणच या संपूर्ण प्रकरणामुळे सोनालीच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. पोलिस पुढील कारवाई करत आहेत.
Powered By Sangraha 9.0