बबितानंतर आता युविका चौधरीला अटक करण्याची मागणी

25 May 2021 16:20:52

Yuvika Choudhari_1 &
 
 
मुंबई : ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ कार्यक्रमातील बबीताजी म्हणजे मुनमुन दत्ताने काही दिवसांपूर्वीच व्हिडिओ ब्लॉगमध्ये जातिवाचक शब्दांचा वापर केला होता. यावरून देशभरातून मुनमुन दत्ताच्या अटकेची मागणी होऊ लागली होती. त्यानंतर तिने सोशल मीडियावरून माफी मागितली. हे प्रकरण ताजे असतानाच आता अभिनेत्री युविका चौधरीने जातिवाचक शब्दांचा उल्लेख केल्याने सोशल मीडियावर तिला अटक करण्याची मागणी होत आहे. यानंतर तिने सोशल मिडियावर आपल्या वक्तव्याबद्दल माफ़ी मागितली आहे.
 
 
 
 
हिंदीमधील प्रसिद्ध अभिनेत्री युविका चौधरीने एका व्हिडिओ ब्लॉगमध्ये जातिवाचक शब्दांचा वापर केला आहे. यावरून आता तिच्या अटकेची मागणी सोशल मीडियावर होत आहे. सध्या #ArrestYuvikaChoudhari हा हॅश टॅग ट्रेंड होत आहे. युविका चौधरीने 'ओम शांति ओम', 'दी पॉवर', 'एस. पी. चौहान' सारख्या चित्रपटात काम केले आहे. तसेच, एमटीव्हीचे कार्यक्रम आणि काही मालिकांमध्येही काम केले आहे. बिग बॉसमध्येही ती स्पर्धक होती. 'रोडीज' फेम प्रिन्स नरूलासोबत २०१८मध्ये लग्न केले. दोघेही सोशल मिडयावर व्हिडिओ ब्लॉग्स करत असतता. अशा एका व्हिडिओचा काही भाग समोर आल्यानंतर नेटीजन्सने तिच्यावर टीका करण्यास सुरुवात केली.
 
Powered By Sangraha 9.0