ड्रॅगनची शेपूट वाकडी ती वाकडीच

24 May 2021 18:19:24

CHIN_1  H x W:
 
नवी दिल्ली : चीन तिबेटमध्ये नियोजनबद्ध महामार्गांचे जाळं विस्तारित आहे. जो महामार्ग भारतीय सीमांवरील अरुणाचल प्रदेशला लागून आहे. मागील सात वर्षांपासून या महामार्गाचे बांधकाम चालू आहे. चीनने आतापर्यंत ३१० मिलियन डॉलर इतका खर्च या प्रकल्पावर केला आहे. भारतीय सीमेलगत असणाऱ्या ब्रम्हपुत्रा नदीवरील धरणावरून हा मार्ग जात असून यामागे भारतातील अरुणाचल प्रदेशावर नियंत्रण ठेवण्याचा चीनचा सुप्त हेतू स्पष्ट होतोय.
 
 
चीन येथेच थांबले नसून ते ब्रम्हपुत्रा नदीवर धरण बांधत आहे भारतातील बहुतांश भागात ब्रम्हपुत्रा नदीचे पाणी जाते ,भौगोलिक आणी कृषीच्या दृष्टीने ही नदी अत्यंत महत्वपूर्ण आहे. तसेच हळहळू चीनने ज्या कारस्थानांनी उत्तर चीन समुद्रावर आपले वर्चस्व प्रस्थापित केले त्याच नियोजन पद्धतीने चीन हिमालयही बळकवण्याचाही प्रयत्न करत आहे. भारतीय सीमेलगत महामार्ग बांधणे हा यातील अत्यंत सूक्ष्म घटक आहे. चीन भारतीय सीमाभागात सैनिकी तळ सुद्धा उभारत आहे.
 
 
२०१४ सालापासून चीनच्या भारतीय सीमाभागात कुरापती सुरूच आहेत. तिबेटच्या आसपासच्या ४००० किमी भागात चीन आपले वर्चस्व गाजविण्याचा प्रयत्न करतोय त्यात भारतातील बहुतांश भाग येतो. हा विवादित प्रदेश असतानाही चीन येथे बांधकाम करत आहे. या महामार्गाचे कारण जरी विकास हे दर्शविले जात असले तरी यामुळे चिनी सैनिकांना भारतात शिरकाव करण्यास सुलभ होईल. चिनी सैनिकांची भारताच्या सीमेवरील हालचालींना वेग येईल.
 
 
 
 
चीन आधीपासूनच भारताच्या सीमाभागातील विविध देशांच्या प्रदेशावर आपला हक्क सांगत आहे. भारतीय सीमाभागातील महत्त्वपूर्ण प्रदेश आपल्या ताब्यात घेऊन महासत्ता बनण्याचे चीनचे स्वप्न काही नवीन नाही. त्यामुळे या प्रदेशांवर हक्क सांगण्यासाठी चीन त्या प्रदेशाच्या आसपास काहीतरी बांधकाम सुरु करते. या बांधकामाला विकासाचे नाव देऊन चीनच्या सीमाभागात कुरापती सुरूच असतात. एखाद बांधकाम पूर्ण झाले कि आपल्या सैनिकी बळावर त्या प्रदेशावर आपला हक्क सांगण्यास सुरु करते, अशी अनेक कारस्थाने चीनने आधी केली आहेत.
 
 
 
Powered By Sangraha 9.0