रशिया आणि चीनमध्ये न्यूक्लियर करार

24 May 2021 16:03:12
CHIN AND RUSSIA_1 &n
 
 


मॉस्को
- रशिया आणि चीनमध्ये न्यूक्लियर करार झाला असून लवकरच रशिया आपले दोन न्यूक्लियर प्लांट चिनी शहरात सुरु करणार आहे. यामुळे रशिया आणि चीन या दोन्ही देशात जवळीक निर्माण होत असून हे भारताला धोकादायक ठरू शकते. चीन पंतप्रधान 'झी झिनपिंग' यांनी रशियन पंतप्रधान 'व्लादिमीर पुतीन' यांच्याशी व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधला.
 
 
 
'युरोपिअन किंग्डम' आणि 'अमेरिका' यांसारखे देश 'न्यूक्लियर प्लांटसाठी'  इतर देशांना मान्यता देत नसल्यामुळे रशिया आणि चीनने न्यूक्लियर करार केला आहे. यामुळे रशियाचे दोन 'न्यूक्लियर पॉवर प्लांट' चीनच्या शहरात बांधले जाणार आहेत. दोन्हीं देशांमध्ये २०१८ साली याचा करार झाला होता. त्यामध्ये सहयोगाने आपण याची बांधणी करू असे ठरविण्यात आले होते.त्यातील ७-८ 'युनिटला' 'तैनवान न्यूक्लियर पॉवर प्लांट', तर २-३ ला 'झुडापू न्यूक्लियर पॉवर प्लांट 'म्हंटले जाईल.
 
 
 
चीनच्या शहरात यशस्वीरीत्या ४ 'प्लांटची' बांधणी केली गेली आहे. इतर 'प्लांटचे' बांधकाम चालू आहे. चीन आणि रशिया मधील हा आतापर्यंतचा मोठा करार असून दोन्ही देशानी या प्रकल्पात समन्वय दर्शविला आहे. यामुळे भारत आणि रशिया यांच्या संबंधात काय परिणाम होतो हे पाहण्यासारखे आहे.
Powered By Sangraha 9.0