बीसीसीआयची कोरोनाबाधीतांसाठी २००० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर

24 May 2021 19:53:53

BCCI_1  H x W:
 
नवी दिल्ली : देशामध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा मोठा प्रभाव दिसत आहे. तर, दुसरीकडे अनेक राज्यांमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे. अशामध्ये अनेकांनी या कोरोनाविरुद्धच्या लढ्यात सहभाग म्हणून आपापल्या परीने मदत केली आहे. गेले काही महिने बीसीसीआयने कोणतीही मोठी मदत केली नाही, असे आरोप होत होते. मात्र, आता यावर बीसीसीआयनेदेखील पुढे येत कोरोनाविरुद्ध लढ्यात भाग घेतला आहे. त्यांनी तब्बल १० लीटर क्षमता असलेले तब्बल २००० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर देण्याचे जाहीर केले आहे.
 
 
 
 
 
 
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आयपीएल २०२१ची स्पर्धा अर्ध्यातच थांबवली गेली. यानंतर बीसीसीआयने कोरोनाबंधीतांसाठी पुढे येऊन मदत करावी अशी मागणी होत होती. यावरून आता बीसीसीआयने २००० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर दान करण्याचा निर्णय जाहीर केला. येत्या महिन्याभरात हे संच भारतभर वितरीत केले जाणार आहे. या ऑक्सिजन संचामुळे भारतातील कोरोनाविरुद्धच्या लढ्यात मदत होईल अशी आशा बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली, सचिव जय शाह आणि कोषाध्यक्ष अरुण सिंग धूमाळ यांनी व्यक्त केली आहे. गेल्यावर्षी २०२० मध्ये बीसीसीआयने कोरोनापीडीतांसाठी ५१ कोटींचे दान केले होते.
Powered By Sangraha 9.0