विदेशातील भारतीय रेस्टॉरंटचा 'अन्नपूर्णा' पुरस्काराने होणार गौरव!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-May-2021
Total Views |
Food _1  H x W:


नवी दिल्ली : विविधतेतून एकता सांगणाऱ्या भारतीय संस्कृतीच्या खाद्यपदार्थांचा हेवा संपूर्ण जगाला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय खाद्यसंस्कृती जपणाऱ्या संस्थांचा गौरव करण्याचा विचार 'इंडियन काऊन्सिल फॉर कल्चरल रिलेशन्स'तर्फे (ICCR) करण्यात येणार आहे.


विदेशातील भारतीय हॉटेल्स आणि रेस्टॉरंटचा गौरव करण्यासाठी 'अन्नपूर्णा' या पुरस्काराचे नियोजन केले जात आहे. 'आयसीसीआर'चे अध्यक्ष विनय सहस्त्रबुद्धे यांनी दीनदयाल उपाध्याय यांच्या चौथ्या स्मृतीव्याख्यानमालेनिमित्त सहस्त्रबुद्धे यांनी ही माहिती दिली. शुक्रवार, २१ मे २०२० रोजी झालेल्या चर्चासत्रात ते बोलत होते.

देशाची खाद्यसंकृती हे स्वतःच एक बलस्थान मानले जाते. याचा पुनःरुच्चार नुकताच प्रख्यात खाद्य इतिहासकार डॉ. कॉलिन टेलर सेन यांनी केला होता. भारतीय खाद्यपदार्थांना वेगळा इतिहास आहे, संस्कृती आहे. अन्नपूर्णा पुरस्काराच्या माध्यमातून याच खाद्यसंस्कृतीची ओळख जगाला करून देण्याच्या अनुशंगाने प्रयत्न  'आयसीसीआर' करत आहे. 
 
डॉ. सेन यांच्यामते, 'भारताने आंतरराष्ट्रीय स्तरावर शाकाहार आणि आयुर्वेदाशी निगडीत पदार्थांमध्ये मोलाचे योगदान दिले आहे. परदेशातही भारतीय रेस्टॉरंट्स अगदी ढाब्यापासून ते अलिशान हॉटेल्समधील पदार्थ खवैय्यांना भूरळ घालतात, असेही सेन म्हणाल्या. भारतीय खाद्यसंस्कृतीने खवय्यांच्या जीभेवर रेंगाळत ठेवलेली चव हीच याची पोचपावती आहे.
 
 
विदेशात होणार 'फूड फेस्ट'
 
'आयसीसीआर'तर्फे पहिल्यांदाच अशाप्रकारचे भारतीय खाद्यपदार्थांचा मुद्दा आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चेसाठी उपलब्ध केला. भारतीय हॉटेल्स आणि खाद्यसंस्कृती माणसं जोडणारी आणि जपणारी आहे. त्याच अनुषंगाने भविष्यात किमान वर्षांतून दोनदा विदेशात या क्षेत्राच्या रणनितीच्या दृष्टीकोनातून 'फूड-फेस्ट' आयोजित करण्याचा मानसही सहस्त्रबुद्धे यांनी व्यक्त केला. या चर्चासत्रात लंडनहून शेफ विनीत भाटीया, मेलबर्नहून शेफ सारहा टॉड्ड आणि प्रिया पॉल, चेन्नईहून सुजन मुखर्जी आणि सौरीश भट्टाचार्य आदी उपस्थित होते.



@@AUTHORINFO_V1@@