उत्तर प्रदेशात एका दिवसात ३ लाखांहून अधिक कोरोना चाचण्या

22 May 2021 20:01:09

up_1  H x W: 0



नवी दिल्ली :
उत्तर प्रदेशात शुक्रवारी एका दिवसात ३ लाख ७ हजार कोरोना चाचण्या करण्यात आल्या असून एवढ्या विक्रमी संख्येने चाचण्या करणारे ते देशातील पहिले राज्य ठरले आहे. त्याचप्रमाणे राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या सध्या १ लाखांवर आली असून रुग्ण बरे होण्याचा दरही ९२.५ टक्क्यांहून अधिक आहे. विशेष म्हणजे १८ ते ४४ वयोगटातील १० लाखांहून अधिक नागरिकांना लसीकरण करणारेही उत्तर प्रदेश देशातील पहिले राज्य ठरले आहे.

उत्तर प्रदेशात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली कोरोना नियंत्रणासाठी प्रशासन कार्यरत आहे. मुख्यमंत्र्यांनी जास्तीतजास्त कोरोना चाचण्या करण्यावर विशेष भर दिला आहे. त्यामुळे शुक्रवारच्या एका दिवसात राज्यात तब्बल ३ लाख ७ हजार करोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. एका दिवसात एवढ्या विक्रमी चाचण्या करणारे उत्तर प्रदेश हे देशातील एकमेव राज्य ठरले आहे. त्याचप्रमाणे आतापर्यंत उत्तर प्रदेशात एकुण ४ कोटी ६५ लाख चाचण्या करण्यात आल्या आहेत. यामध्येही उत्तर प्रदेशच देशातील अन्य राज्यांपेक्षा आघाडीवर आहे.


सक्रिय रुग्णांची संख्या १ लाखांवर


उत्तर प्रदेशात सक्रिय रुग्णांची संख्या वेगाने घटत असून सध्या राज्यात १ लाख ६ हजार २७६ सक्रिय रुग्ण आहेत. विशेष म्हणजे राज्यातील रुग्ण बरे होण्याचा दर आता ९२.५ टक्क्यांहूनही अधिक झाला आहे. राज्यात ३० एप्रिल रोजी ३ लाख १० हजार ७८३ सक्रिय रुग्ण होते, मात्र गेल्या ३ आठवड्यांमध्ये २ लाख १५ हजार रुग्ण बरे झाले आहेत.
Powered By Sangraha 9.0