'मुख्यमंत्री घराबाहेर पडले या बातमीची राज्याला उत्सुकता'

20 May 2021 13:13:04

nilesh rane_1  



मुंबई :
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घराबाहेर निघाले ही महाराष्ट्रातील जनतेसाठी ब्रेकिंग न्यूज ठरेल, अशी खोचक टीका भाजप नेते नितेश राणे यांनी केली आहे. तौक्ते चक्रीवादळाचा तडाखा मोठ्याप्रमाणावर कोकण किनारपट्टीला बसला. यानंतर तीन दिवस उलटूनही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अद्याप कोकण किनारपट्टी तर सोडाच मात्र मुंबईतील तडाखा बसलेल्या भागातही पाहणी दौरा केला नाही. मात्र सध्या कोकण दौऱ्यावर असणाऱ्या विरोधीपक्षनेत्यांनी या दौऱ्यासाठी इ पास काढला आहे का ? अशी माहिती माहिती अधिकारातून विचारण्यात आली आहे. हाच मुद्दा पकडत निलेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला.


ट्विट करत निलेश राणे म्हणाले, देवेंद्रजी फडणवीस यांनी महाराष्ट्राचा दौरा करताना ई-पास काढलाय का असं माहितीच्या अधिकारात विचारण्यात आलं. तसंच उद्धव ठाकरे कधी ई-पास काढणार आहेत किंवा काढणार की नाही हे पण माहितीच्या अधिकारात विचारावं. उद्धव ठाकरे घराच्या बाहेर पडले, ही बातमी बघायला महाराष्ट्राची जनता थांबली आहे, असे निलेश राणे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.


कोपरगाव येथील माहिती अधिकारी कार्यकर्ते संजय काळे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या कोकण दौऱ्यासंदर्भात काही प्रश्न उपस्थित केले होते. कोकण दौऱ्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी ई-पास काढला आहे का?, असा प्रश्न त्यांनी माहिती अधिकारातंर्गत विचारला होता.

Powered By Sangraha 9.0