"उपमुख्यमंत्री गल्ली-गल्ली फिरले तरीही भाजप हा एकच पर्याय"

02 May 2021 15:53:59

Nitesh Rane_1  
 
 
 
मुंबई : देशात ५ राज्यांच्या निकालाची चर्चा आहे. मात्र, राज्यामध्ये सर्वांचे लक्ष हे पंढरपूर पोटनिवडणुकीकडे आहे. यामध्ये पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजप उमेदवार समाधान आवताडे हे सर्व फेऱ्यांमध्ये  आघाडीवर होते. यावर आता भाजपचा विजय निश्चित असल्याचे सांगितले जात आहे. यावरून भाजप नेते नितेश राणे यांनी महाविकास आघाडी मंत्र्यांवर आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली आहे.
 
 
 
 
 
 
"पंढरपुर पोट निवडणुकीमधे महाविकास आघाडीच्या मंत्र्यांपासून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यापर्यंत सगळे गल्ली गल्ली फिरले. तरीही त्यांना लोकांनी नाकारले. महाविकास आघाडीतील आमदारांना हा संदेश आहे किंवा येणारा धोका समजा. तसेच पाऊले पुढे टाका. भाजप हा एकच पर्याय आहे. महाराष्ट्राची जनता आमच्या बरोबर आहे!!" असे म्हणत त्यांनी महाविकास आघाडीवर टीका केली. 
Powered By Sangraha 9.0