'द फॅमिली मॅन २'चा ट्रेलर आला आणि विरोध सुरु झाला ; वाचा सविस्तर

19 May 2021 16:37:02

Family Man_1  H
 
 
 
मुंबई : बऱ्याच वर्षांच्या प्रतिक्षेनंतर अखेर मनोज वाजपेयीच्या 'द फॅमिली मॅन २'चा ट्रेलर प्रदर्शित झाला. यामध्ये दक्षिणात्य सुप्रसिद्ध अभिनेत्री समांथा अक्कीनेनी हिंदीमध्ये पदार्पण करणार आहे. तसेच, आता हा ट्रेलर प्रदर्शित होताच #FamilyMan2_against_Tamils हा ट्रेंड ट्विटरवर सुरु झाला आहे. मागचा सीजनही काही कारणांनी वादात सापडला होता. तरीही, २०१९मध्ये प्रदर्शित झालेल्या पहिल्या पर्वानंतर चाहते दुसऱ्या पर्वाची आतुरतेने वाट पाहत होते. ही वेब सिरीज ४ जूनला अॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित होणार आहे.
 
 
 
 
वाद आणि 'द फॅमिली मॅन'
 
 
२०१९मध्ये सुरु प्रदर्शित झालेल्या द फॅमिली मॅनच्या पहिल्या पर्वावर अनेक जणांनी देशविरोधी भावना भडकावण्याचे आरोप केले गेले होते. तसेच, आता दुसऱ्या पर्वाचा ट्रेलर प्रदर्शित होताच #FamilyMan2_against_Tamils चा हॅश टॅग ट्रेंड होत आहे.
 
 
 
 
 
 
काही जणांनी आरोप केले आहेत की, ही मालिका तमिळ लोकांना दहशतवादी म्हणून दाखवले आहे. यामध्ये श्रीलंकामध्ये अनेक वर्षांपासून चालू असलेल्या संघर्षाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला आहे, असे आरोप सोशल मिडियावर केले जात आहेत.
 
 
 
 
 
 
तसेच, दक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या समांथाला याचे परिणाम भोगावे लागतील. तिचे चित्रपट दक्षिण भारतात प्रदर्शित होऊ देणार नाही, असेदेखील लोकांनी मते मांडली आहेत.
 

 
 
ट्रेलरने वाढवली मालिकेची उत्सुकता 
 
 
मालिकेचा हिरो श्रीकांत हा पहिल्या सीजनप्रमाणेच कुटुंब आणि काम यामधील तारेवरची कसरत करताना दिसत आहे. तर, दुसरीकडे दक्षिणात्य अभिनेत्री समांथा अक्कीनेनीची भूमिका ही भारतामध्ये काहीतरी मोठी घडामोड करण्याच्या तयारीत असल्याचे वरवर चित्र दिसत आहे. या ट्रेलरमधून तिच्या भूमिकेचे गूढ हे उकलेले नाही. तसेच, श्रीकांत हा कौटुंबिक समस्यांना सांभाळत पुन्हा एकदा देशावर येणारे मोठे संकट टाळणार का? त्याच्यापुढे आणखी किती अडचणी येणार? यासाठी ४ जूनची वाट पहावी लागणार आहे. ९ भागांची ही सिरीज असणार आहे. तसेच, या दोघांव्यतिरिक्त प्रियमणि, शारिब हाशमी, शरद केलकर आणि श्रेया धनवंतरी यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. यामध्ये नुकतेच स्वर्गवासी झालेले कलाकार असिफ बसरा यांचीदेखील एक महत्वाची भूमिका आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0