भाऊ तोरसेकर यांनी का केले अनिल थत्तेंचे स्वागत ?

17 May 2021 18:50:49
tHUMB  _1  H x



मुंबई : महाMTB व सा.'विवेक'तर्फे आयोजित 'गगनभेदी थत्ते' ही नवी मुलाखतींची श्रुंखला सुरू करण्यात आली आहे. यातील पहिल्या भागाने 'पवार फडणवीस फॉर्म्युला' - शक्य आणि आवश्यक राजकीय वर्तूळात धमाल उडवून दिली आहे. नेहमीच दबक्या आवाजात चर्चिले जाणाऱ्या महाराष्ट्रातील सत्तांतराच्या या समीकरणाचा डाव ज्येष्ठ पत्रकार अनिल थत्ते यांनी सोप्या शब्दांत मांडून दाखवला आहे. थत्तेंच्या या शैलीचे ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर यांनी स्वागत केले आहे.
 
 
 
 महाMTB व 'सा.विवेक'च्या मंचावर निमंत्रित केल्याचे स्वागत करत भाऊंनी थत्तेंची लेखन शैली, शब्दसामग्री याचेही कौतूक केले. थत्तेंच्या गगनभेदी या पाक्षिकाचा उल्लेख त्यांनी केला. थत्तेंकडे असलेली सहजता, समोरच्याला खिळवून ठेवण्याची पद्धत मला भावते, असे भाऊंनी मोकळेपणाने सांगितले.
 
 
प.बंगाल ते पंढरपूर
 
पाच राज्यांच्या निवडणूक निकालांचे विश्लेषण करणारे मराठी न्यूज वेब पोर्टलवरील मॅरेथॉन चर्चा असलेल्या 'प.बंगाल ते पंढरपूर' या चर्चासत्रातही थत्ते सहभागी झाले होते. थत्तेंनी यावेळी केलेल्या विश्लेषणाचाही भाऊंनी आवर्जून उल्लेख केला आहे. तसेच यानंतर सलग प्रदर्शित झालेल्या दोन्ही मुलाखतींचाही दाखला देत थत्तेंची ही शैली शिकण्यासारखी आहे, असे म्हटले. 'गगनभेदी थत्ते' या अनोख्या प्रयोगाचेही भाऊंनी स्वागत केले आहे.


Powered By Sangraha 9.0