नवी दिल्ली : केंद्रीय शिक्षण मंत्री डॉ रमेश पोखरियाल निशंक यांना या वर्षीचे आंतरराष्ट्रीय अजेय सुवर्ण पदक प्रदान करण्यात येणार आहे. महर्षि संघटनेचे जागतिक अध्यक्ष डॉ टोनी नाडर यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, की, डॉक्टर निशंक यांना लेखन तसंच सामाजिक आणि सार्वजनिक जीवनाच्या माध्यमातून मानवतेसाठी त्यांच्या कटीबद्धतेसाठी हा पुरस्कार त्यांना देण्यात येणार आहे. केंद्र सरकारच्या नवीन शैक्षणिक धोरण निर्मितीत त्यांच्या महत्वपूर्ण भूमिकेसाठी निशंक यांची निवड करण्यात आली आहे.