डिजिटल व्यवहारांमध्ये भारत जगात अव्वल

14 May 2021 15:47:04

dIGITAL INDIA _1 &nb



मुंबई : केंद्र सरकारने डिजिटल व्यवहारांना चालना देत रोख व्यवहारांना सक्षम पर्याय निर्माण केला. किरकोळ दुकानदार ते मॉल्समध्ये सुरक्षित आणि विश्वसनीय यंत्रणांमुळे भारत हा डिजिटल व्यवहार करणारा जगातील एक प्रमुख देश बनला आहे. अमेरिकेसारखा विकसित देश या गणनेत ९व्या क्रमांकावर आहे. जपान सातव्या क्रमांकावर आहे.
 
 
भारतात एकूण अडीच हजार डिजिटल व्यवहार
 
उपलब्ध आकडेवारीनुसार, वर्ष २०२० मध्ये भारतात एकूण २५४७ कोटी व्यवहार पूर्ण झाले आहेत. दरम्यान चीनने आपल्याला काँटे की टक्कर दिली आहे. चीनमध्ये एकूण १५७४ कोटी डिजिटल व्यवहार पूर्ण झाले आहेत. दक्षिण कोरिया जगात तिसऱ्या क्रमांकावर आहे. तिथे एकूण ६०१ व्यवहार पूर्ण झाले आहेत. चौथ्या क्रमांकावर ५२४ कोटी व्यवहारांसह चौथ्या स्थानी, २८२ कोटी व्यवहारांसह युके पाचव्या स्थानी आहे.
 
 
जपान सातव्या क्रमांकावर
 
नायझेरीया या प्रकरणी १९१ कोटी व्यवाहारांसह सहाव्या स्थानी आहे. सातवा क्रमांक जपानचा लागतो. जपानमध्ये एकूण १६७ कोटींचे व्यवहार पूर्ण झाले आहेत. १३३ कोटींसह ब्राझील आणि अमेरिका केवळ १२१ कोटींच्या व्यवहारांवर समाधान मानून आहे. मॅक्सिकोचे ९४ कोटींचेच डिजिटल व्यवहार पूर्ण झाले आहेत. या देशाचा दहावा क्रमांक आहे.
 
 
लोकसंख्येनुसार आकडेवारीत वाढ
 
भारतातील लोकसंख्येचा मोठा भाग डिजिटल व्यवहारांवर अवलंबून आहे. त्यामुळे डिजिटल व्यवह्रांरांच्या शर्यतीत देश पुढे आला आहे. दरम्यान, चीनची लोकसंख्या भारतापेक्षा जास्त असूनही तो दुसऱ्या क्रमांकावर आहे. भारतात लॉकडाऊनच्या काळात सर्वात जास्त डिजिटल व्यवहार करण्यात आले आहेत. एकूण व्यवहारांची संख्या २५ अब्ज डॉलर्स इतकी आहे. एकूण १३० कोटी लोकसंख्येच्या २० टक्के जनतेने डिजिटल व्यवहारांमध्ये सक्रीय सहभाग नोंदवला आहे.
Powered By Sangraha 9.0