मुंबई : करमुसे प्रकरणात दाखल केलेल्या याचिकेमुळे महाराष्ट्र सरकारचे धाबे दणाणले आहेत. १० मे रोजी सरकारच्या गृह विभागाने सदर खटल्यात विशेष सरकारी अभियोक्ता म्हणून अनिल साखरे यांची नेमणूक केली असून त्यांना प्रत्येक सुनावणीला अडीच लाख रुपये व्यावसायिक फी म्हणून देण्यात यावेत असा शासन निर्णय झाला. यावर आता भाजपने टीका करत, "जनतेचा पैसा स्वतःच्या बापाचा पैसा असल्यासारखं उडवतात" असे टीकास्त्र भाजप नेते निलेश राणे सोडले आहे.
"ठाकरे सरकारातील मंत्री महाराष्ट्राचे जावई आहेत काय? लफडी करायची यांनी आणि पैसे भरायचे महाराष्ट्राने. जनतेचा पैसा स्वतःच्या बापाचा पैसा असल्यासारखा उडवतायत. मुख्यमंत्री स्वतःच्या बापाचे स्मारक सरकारच्या पैशातून बांधतायत तर मंत्री वेगळे काय करणार?" असा खोचक सवाल निलेश राणे यांनी ट्विट करत विचारला आहे.