रशियाच्या 'स्पुटनिक'चे लसीकरण भारतातही सुरू होणार!

13 May 2021 19:35:22
 
spu_1  H x W: 0




पुढील आठवड्यापासून ‘स्पुटनिक’चे लसीकरण सुरू होणार;
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची माहिती
 




नवी दिल्ली
 : रशियाची ‘स्पुटनिक V’ ही लस भारतात काही दिवसांपूर्वीच दाखल झाली आहे. जुलैपासून त्याचे भारतात उत्पादन सुरु होणार असून पुढच्या आठवड्यापासून ‘स्पुटनिक V’चे लसीकरण सुरू होणार आहे, अशी माहिती निती आयोगाचे सदस्य डॉ. व्हि. के. पॉल यांनी गुरूवारी पत्रकारपरिषदेत दिली.



रशियाची ‘स्पुटनिक V’ ही लस भारतात काही दिवसांपूर्वीच दाखल झाली आहे. पुढील आठवड्यापासून ती बाजारात मर्यादित प्रमाणात उपलब्ध होणार आहे. त्याचप्रमाणेच पुढील आठवड्यापासून देशातील नागरिकांना त्याचे लसीकरणदेखील सुरु करण्यात येणार आहे. या लसीचे उत्पादन भारतातदेखील होणार असून साधारणपणे पुढील दोन महिन्यात म्हणजे जुलैपासून भारतातही या लसीचे उत्पादन सुरु करण्यात येणार आहे, असे डॉ. पॉल यांनी सांगितले.


देशात पुरेशा प्रमाणात लस उपलब्ध करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरु असल्याचे डॉ. पॉल यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, ऑगस्ट ते सप्टेंबर या कालावधीमध्ये २१६ कोटी लसींच्या मात्रा उपलब्ध होण्याची आशा आहे. त्यामध्ये ५५ कोटी मात्रा कोव्हॅक्सिनच्या, ७५ कोटी कोव्हिशिल्ड, ३० कोटी बायो ई सबयुनिट, ५ कोटी झायडस कॅडिला, २० कोटी नोवाव्हॅक्सिन, १० कोटी भारत बायोटेक नेझल व्हॅक्सिन, ६ कोटी जिनोव्हा आणि १५ कोटी स्पुटनिक यांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे डब्ल्यूएचओने परवानगी दिलेल्या लसींनाही भारतात प्रवेश देण्यावविषयी निर्णय घेण्यात येणार असल्याचे पॉल यांनी नमूद केले.


Powered By Sangraha 9.0