२ ते १८ वर्षे वयोगटावर 'कोव्हॅक्सिन'च्या चाचणीला परवानगी

13 May 2021 18:39:51
Covaccine _1  H




नवी दिल्ली : भारतीय औषध महानियंत्रकांतर्फे (डिजीसीआय) भारत बायोटकला त्यांच्या 'कोव्हॅक्सिन' या कोरोनावरील लशीची चाचणी २ ते १८ वर्षे या वयोगटासाठी करण्याची परवानगी देण्यात आली आहे. भारत बायोटेकतर्फे त्यांच्या 'कोव्हॅक्सिन' या लशीची चाचणी वयवर्षे २ ते १८ वयोगटातील मुलांवर करण्याची परवानगी मिळावी, असा अर्ज केला होता.
 
 
लहान मुलांनाही लसीचे संरक्षण मिळावे, हा हेतू त्यामागे होता. भारत बायोटेकच्या अर्जावर केंद्रीय औषध मानक नियंत्रण संघटनेच्या तज्ज्ञ समितीने सविस्तर विचार केला. त्यानंतर दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यातील मानवी चाचणी घेण्याची परवानगी भारत बायोटेकला देण्यात आली आहे. आता भारत बायोटेतकतर्फे ५२५ निरोगी स्वयंसेवकांवर ही चाचणी घेण्यात येईल. या चाचणीत शून्य दिवस आणि २८ दिवस दरम्यान अंतस्नायुमधून लसीच्या दोन मात्रा दिल्या जातील.



Powered By Sangraha 9.0