भारतीय खेळाडूंना निर्बंध आवडत नव्हते : मुंबई इंडियन्सचा प्रशिक्षक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-May-2021
Total Views |

MI_1  H x W: 0
 
 
 
मुंबई : देशामध्ये कोरोनाची परिस्थिती गंभीर असताना आयपीएल २०२१मध्येही कोरोनाच्या प्रादुर्भावाचा शिरकाव झाला. यामुळे आयपीएलची स्पर्धा ही अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली. काही संघांमधील खेळाडूंना आणि सदस्यांना कोरोनाची लागण झाल्याने बीसीसीआयला ही स्पर्धा अर्ध्यातच स्थगित करावी लागली. आता यामागचा धक्कादायक खुलासा प्रसिद्ध मुंबई इंडियन्सच्या प्रशिक्षकाने केला आहे. त्याच्या म्हणण्यानुसार, " भारताचे काही वरिष्ठ खेळाडूंना निर्बंध लादलेले आवडत नव्हते."
 
 
 
 
मुंबई इंडियन्सचे क्षेत्ररक्षक प्रशिक्षक जेम्स पामेंट यांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हंटले आहे की, " बायो बबलमध्ये आम्हाला सुरक्षित वाटत होते. पण काही भारतीय वरिष्ठ खेळाडूंना ही गोष्ट आवडत नव्हती. याबद्दल त्यांना काही बोललेलेही आवडत नव्हते. आम्हाला पूर्वी माहित होते की जर बबलमध्ये काहीतरी चूक झाली तर प्रवास करणे सर्वात मोठे आव्हान असेल." पुढे त्यांनी याच मुलाखतीमध्ये आयोजन आणि काही भारतीय खेळाडूंचे कौतुकही केले आहे. तो म्हणाला की, "काही भारतीय खेळाडूंचे कुटुंबीय आजारी होते, परंतु तरीही त्या खेळाडूंनी उत्साह वाढविला आणि खेळतच राहिले. भारतीयांनी भारतीयांसाठी चालवल्या जाणाऱ्या लीगचा भाग होणे हे भाग्यच." ट्रेंट बोल्ट, मॅट हेन्री, जेम्स नीशम आणि गोलंदाजी प्रशिक्षक शेन बॉन्ड यांच्यासमवेत जेम्स पामेंट ऑकलंडला गेला होता.
@@AUTHORINFO_V1@@