इस्राइल आणि पॅलेस्टाईन यांनी केले एकमेकांवर हवाई हल्ला

11 May 2021 18:06:00
                                                                       isryal_1  H x W



जेरूसलेम : काही दिवसांपूर्वी पॅलेस्टाईनचे आंदोलनकर्ते आणि इस्रायली पोलीस यांच्यात झालेली चकमक आता एकमेकांवर हवाई आक्रमणापर्यंत पोहचली आहे.इस्रायलने त्याच्यावर गाजा पट्टी येथून झालेल्या हवाई हल्ल्याला जवाबी उत्तर देत पॅलेस्टिनच्या आतंकवादी तळांना निशाणा बनवून त्यांच्यावर हवाई आक्रमण केले आहे.
 
 
 
हमासद्वारा संचालित केले जाणारे पॅलेस्टीनमधील आरोग्य मंत्रालयने वक्तव्य केले आहे की इस्रायलने केलेल्या हवाई आक्रमणात मुलांबरोबर २० लोकांचा जीव गेला आहे. तर इस्रायल मध्ये हमासने केलेल्या हवाई आक्रमणामुळे इस्रायलला आपले संसद खाली करावयास लागले. होते.जेरुसलेम मधील 'शेख जर्राह' जिल्ह्यातील लोकांना इस्रायल सरकारने जागा खाली करावयास सांगितले कारण त्यांना तिथे ज्यू सेटलर्स यांना वास्तव द्यायचा होता.
 
 
याविरोधात पॅलेस्टाईनच्या लोकांनी आंदोलन चालू केले. इस्रायलच्या पोलीसांनी सांगितले कि एकदिवस अचानक पॅलेस्टाईन लोक मशीद मध्ये घुसले.त्यांनी दगडांनी व बॉम्ब गोळ्यांनी हल्ला चालू केला तर दुरीकडे पॅलेस्टाईनमधील लोकांचे म्हणणे आहे कि रमजानच्या दिवसात नमाज वाचायला आलेल्या मुस्लिम समुदायावर इस्रायल पोलिसानी आक्रमण चालू केले. यात अनेक नागरिक गंभीर जखमी झाले आहेत.
 
 
 
हमासने याबद्दल इस्रायलला कडक प्रत्युत्तर दिले व हवाई आक्रमणही केले याचे प्रत्युत्तर देताना इस्रायलनेही पुन्हा आक्रमण केले .इस्रायलच्या पंतप्रधान नेत्यानाहू यांनी 'जशास तसे उत्तर आम्ही देऊ' असे वक्तव्य केले आहे. .अमेरिकेच्या विदेश मंत्री 'एंटनी ब्लिंकन' यांनी हमासने हे हवाई आक्रमण थांबावे असा सक्त इशारा दिला आहे.इस्रायल आणि पॅलेस्टाईनचा वाद फार जुना आहे.




Powered By Sangraha 9.0