महाMTB Impact : MIDC डोंबिवलीतील 'त्या' झाडांची छाटणी सुरू

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-May-2021
Total Views |
  midc tree cutting photo_1
 
 
 


डोंबिवली : डोंबिवली MIDC परिसरातील झाडांच्या फांद्या विजेच्या तारांना लागत असल्याने त्यांची छाटणी आवश्यक होती. या प्रकरणी दै.'मुंबई तरुण भारत'तर्फे डोंबिवलीतील झाडांचे सर्वेक्षण करा, या मथळ्याखालील वृत्त २६ एप्रिल रोजी प्रकाशित करण्यात आले होते. 'महाMTB'तर्फे या प्रकाराबद्दल विशेष व्हीडिओ वार्तांकन करणारा रिपोर्ट प्रकाशित करण्यात आला होता. या दोन्ही वृत्तांची दखल घेत कल्याण डोंबिवली महापालिका व महावितरणतर्फे धोकादायक ठरत असणाऱ्या फांदया तोडण्यास सुरूवात केली आहे.
 
 
 
निवासी भागातील झाडांच्या फांदया रस्त्यावर लटकत असल्याने नागरिकांना त्यांचा त्रास सहन करावा लागत होता. या फांदया विनापरवानगी तोडताही येत नव्हत्या. फांद्यामुळे कोणत्याही प्रकारची दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त केली जात होती. यावर उपाय म्हणून महापालिका, महावितरण आणि लोकप्रतिनिधी त्वरीत सर्वेक्षण करून उपाययोजना करण्याची गरज आहे, अशी मागणी डोंबिवली वेल्फेअर असोसिएशनचे सचिव राजू नलावडे यांनी केली होती.
 
 
फांद्याचे सर्वेक्षण व्हावे यासाठी स्थानिक नागरिक देखील मागणी करत होते. दरवर्षी झाडे पडण्याच्या घटना MIDC परिसरात मोठय़ा प्रमाणात घडत असत त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता. झाडांच्या काही फांद्या उच्च विद्युत प्रवाहाच्या तारांना स्पर्श करत होत्या. यामुळे वीज पुरवठाही खंडीत होतो. महावितरणकडे वारंवार मागणी करूनही पुरेसे लक्ष जात नव्हते. दै. 'मुंबई तरूण भारत' व 'महाMTB'च्या बातमीमुळे कल्याण डोंबिवली महापालिकेच्या उद्यान विभागातर्फे एमआयडीसी निवासी येथे छाटणीचे काम सुरू करण्यात आले आहे. पथदिव्यांच्या आड येणाऱ्या फांद्याचीही छाटणी सुरू करण्यात आली आहे उद्यान अधीक्षक महेश देशपांडे यांचा देखरेखखाली सदर फांदया छाटणीचे काम सुरू आहे.




@@AUTHORINFO_V1@@