कोरोना झाला तर संघाबाहेर! ; कोरोनापासून वाचणार तोच इंग्लंडदौऱ्यावर जाणार

11 May 2021 15:49:54

Team India_1  H
 
मुंबई : बीसीसीआयने इंग्लंड दौऱ्यावर जाण्यापूर्वी खेळाडूंना कडक निर्देश दिले आहेत. त्यांनी खेळाडूंना सांगितले आहे की, "इंग्लंडला जाण्यापूर्वी एखादा खेळाडूला कोरोनाची लागण झाल्यास, त्याला संघातून बाहेर करण्यात येईल." कोरोनामुळे आयपीएलची स्पर्धा ही अनिश्चित काळासाठी पुढे गेली आहे. तसेच, इंग्लंडमध्ये एक वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना तसेच इंग्लंडसोबत ५ कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहेत. त्यामुळे हे कठोर पाऊले उचलली जात आहेत. आयपीएलच्या प्रकरणानंतर आता बीसीसीआय सावधगिरी बाळगत पुढचे नियोजन अखात असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
बीसीसीआयकडून कठोर पाऊले
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईमध्ये कोरोना पॉजिटिव्ह आल्यानंतर एखाद्या ठराविक खेळेडूला स्वतंत्र चार्टर्ड प्लेनने इंग्लंडला पाठवले जाणार नाही असे निर्देश बीसीसीआयने खेळाडूंना दिले आहेत. खेळाडूंसह त्यांच्या कुटुंबियांची चाचणी केली जाणार आहे. मुंबईतून इंग्लंडला जाण्यापूर्वी खेळाडूंना दोन निटेटिव्ह चाचण्या गरजेच्या असतील. तसेच, खेळाडूंना खासगी कार आणि विमानानेच प्रवास करण्याचे निर्देश बीसीसीआयने दिले आहेत.
कसा असेल भारतीय संघाचा हा दौरा?
मुंबईमध्ये क्वारंटाइन होण्यापूर्वी सावध राहण्याचा इशारा खेळाडूंना देण्यात आला आहे. १९ मे रोजी भारतीय संघ मुंबईत बायो बबलमध्ये दाखल होईल. त्यानंतर पहिल्याच दिवशी भारतीय खेळाडू, सपोर्ट स्टाफ आणि त्यांच्या कुटुंबियांची कोरोना चाचणी करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, बीसीसीआय आणखी एक वेगळा बायो बबल तयार करण्यात आला आहे. ज्यामध्ये २० वेगवेगळ्या राज्यांमधून आलेल्या खेळाडूंना ठेवण्यात येईल, कारण विविध राज्यांमध्ये कोरोनाची परिस्थिती ही विभिन्न आहे.
 
 
 
Powered By Sangraha 9.0