कोरोनाशी लढायचं होतं कंगनाशी नाही : सुनावणीवर १.८७ कोटी खर्च

11 May 2021 16:29:38

Kangna _1  H x
 


मुंबई : 'ठाकरे सरकारचे दीड वर्ष फक्त अर्णव गोस्वामी, कंगना रणौत यांच्यासोबत दोन हात करण्यात गेले आहेत. राज्यात ऑक्सिजन प्लँटसची कमतरता आहे, लस व इंजेक्शन कमी, डॉक्टर्स कमी आहेत, आरोग्य कर्मचारी वर्गाचे पगार रखडलेत ही परिस्थिती असताना केवळ सुनावण्यांसाठी १ कोटी ८७ लाख ५० हजार खर्च झाल्याचा आरोप भाजप नेते माजी खासदार निलेश राणे यांनी केला आहे.
 
 
 
 
राज्य सरकारतर्फे प्रति सुनावणी १२ लाख ५० हजार रुपये प्रतिसुनावणी खर्च झाल्याची एक प्रत राणे यांनी ट्विट केली आहे. न्यायालयीन कामकाज हाताळण्यासाठी राज्य सरकारतर्फे ज्येष्ठ विधीज्ञ अभिषेक मनू सिंघवी यांना व्यावसायिक रक्कम देण्यात आली आहे. शिवसेना विरुद्ध कंगना रणौत आणि अर्णब गोस्वामी यांच्या विरोधात लढण्यासाठी इतका खर्च आणि आरोग्य कर्मचारी वेतनाविना वंचित आहेत, त्यांचा विचार का झाला नाही, असा प्रश्न आता विचारला जात आहे.



Powered By Sangraha 9.0