कुस्तीपटू सुशीलकुमारला लुक आऊट नोटीस

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-May-2021
Total Views |

Sushilkumar_1  
 
 
नवी दिल्ली : भारतासाठी दोनवेळा ऑलिम्पिक पदक जिंकलेल्या सुशीलकुमारविरोधात लुक ऑउट नोटीस जारी करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी दिल्लीतील छत्रसाल स्टेडीयममध्ये २ कुस्तीपटूंच्या गटात हाणामारी झाली. यामध्ये माजी ज्युनियर राष्ट्रीय चॅम्पियनशिप कुस्तीपटू २३ वर्षीय सागरकुमार याचा मृत्यू झाला. याप्रकरणी त्याच्या हत्येमागे सुशीलकुमारचा हात असल्याचे आरोप सागरच्या कुटुंबीयाने केला. सध्या सुशीलकुमार फरार असून तो नेपाळमध्ये पळण्याच्या तयारीत असल्याचे सांगितले जात आहे.
 
 
 
काही दिवसांपूर्वी दिल्लीतील छत्रसाल स्टेडियममध्ये कुस्तीपटूंच्या दोन गटामध्ये मारामारी झाली. यामध्ये २३ वर्षीय ज्युनिअर राष्ट्रीय चॅम्पियन सागर कुमार याचा मृत्यू झाला. यामध्ये कुस्तीपटू सुशील कुमार याचे नाव समोर आले. उत्तर पश्चिम दिल्लीचे अतिरिक्त डीसीपी डॉ. गुरिकबल सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, "या हत्येप्रकरणात सुशील कुमार आणि त्याच्या सहकाऱ्यांचे नाव पुढे आले आहे. आम्ही त्याच्या घरी छापा टाकण्यास गेलो असता त्याने घरातून पळ काढला होता."
 
 
 
या हाणामारीत सोनू महल (३५ वर्षे) आणि अमित कुमार (२७ वर्षे) हे दोघे जखमी झाले आहेत. या प्रकरणात पोलिसांनी प्राथमिक तक्रार दाखल केली असून प्रिन्स दलाल (२४ वर्षे) या एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी घटनास्थळावरुन एक बंदूक देखील जप्त केली आहे. तसेच, या संदर्भात पकडण्यात आलेला आरोपी प्रिन्स दलाल याच्या मोबाईलमधून हाणामारीचा एक व्हिडियोदेखील समोर आला आहे. यामध्ये सुशील कुमार आपल्या मित्रांसमवेत सागर आणि त्याच्या मित्रांना मारत असल्याचे चित्रित झाले असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे सुशील कुमारच्या अडचणी वाढल्या आहेत.
 
@@AUTHORINFO_V1@@