’जस्ट इट’ - टेस्टी भी, हेल्दी भी!

    दिनांक  10-May-2021 23:14:57
|

JUST EAT_1  H xआधी फक्त अन्न, हवा, पाणी या मानवाच्या मूलभूत गरजा होत्या. काळाच्या ओघात वेगाने होणार्‍या शहरीकरणामुळे, बिघडलेल्या पर्यावरणाशी आणि जीवनशैलीशी निगडित रोगदेखील त्याच वेगाने बळावले. त्यामुळे आता शुद्ध आणि पौष्टिक अन्न, शुद्ध हवा आणि शुद्ध पाणी या आपल्या मूलभूत गरजा झाल्या आहेत. यापैकी शुद्ध हवा आणि शुद्ध पाणी याविषयी जेवढी जागरुकता दिसते, तेवढी शुद्ध आणि पौष्टिक अन्नासाठी दिसून येत नव्हती. लहानपणापासून ‘जंक फूड’च्या आहारी गेलेली आजची शहरी आणि ग्रामीण पिढी हा आजचा ज्वलंत प्रश्न आहे, याची पुरेशी जाणीवदेखील जनमानसांत झाली नव्हती.
 
 
 
परंतु, कोरोनाच्या साथीमुळे, शरीराची रोगप्रतिकारकशक्ती या विषयावर आता थोडी फार जागरुकता दिसायला लागली आहे. ‘जंक फूड’मुळे रोगप्रतिकारकशक्ती कमी होते आणि आजाराचा कालावधी आणि तीव्रता वाढते, हे आता कुठे लोकांच्या लक्षात यायला लागलं आहे. ’जंक फूड’ म्हणजे असं अन्न ज्यात पोषणमूल्य (प्रोटिन्स, व्हिटामिन्स, मिनरल्स, फायबर) यांचा अभाव असतो आणि फक्त उष्मांक, साखर, मीठ, तेल यांचाच प्रभाव असतो. अशा अन्नामुळे भूक नीट भागत नाही, ‘क्रेव्हिंग’ होतं, वजन वाढतं आणि रक्तदाब, मधुमेह, हृदयरोग, कर्करोग असे आजार वयाच्या तिशीमध्येच हजेरी लावतात.
 
 
 
सभोवताली नजर टाकलीत तर बाहेरचे कोणतेही खाद्यपदार्थ (उदा. पाव, बिस्किट, केक, पेस्ट्री, बर्गर, पिझ्झा, पास्ता, वेफर्स, नमकीन, नूडल्स, चॉकलेट्स इ.) हे मैदा, साखर, वनस्पती तूप, पाम ऑईल अशा आरोग्यास घातक घटकांनीच तयार केलेले असतात. रोग झाल्यावर उपचार करण्यापेक्षा, रोग होणारच नाहीत, अशी उपाययोजना करण्यावर भर देणार्‍या, डॉ. विद्या क्षीरसागर यांनी योग्य धान्यांचा वापर करुन पौष्टिक खाद्यपदार्थ बनविण्यासाठी कल्याणजवळील मुरबाड, एमआयडीसीमध्ये ‘सकस फूड्स’ नावाने ‘फूड प्रोसेसिंग युनिट’ सुरु केले.
 
 
ग्रामीण महिलांना रोजगार देण्याबरोबरच जास्तीत जास्त ‘हायजेनिक’ पद्धतीने बनवलेले ‘पौष्टिक पॅक्ड फूड’चे पर्याय निर्मिती करण्यावर त्यांनी भर दिला. त्या स्वत: ‘एमबीबीएस’ आणि ‘प्रीव्हेंटिव्ह मेडिसीन’मधील तज्ज्ञ असून ‘पब्लिक हेल्थ’मधील कामाचा अनुभव, ‘हायजिन’ आणि ‘न्यूट्रिशन्स’ यांचं ज्ञान त्यांना उपयोगी पडलं. गहू, ज्वारी, बाजरी, नाचणी, हिरवा मूग, सोयाबिन, शेंगदाणे, तीळ, केमिकल फ्री गूळ, गाईचे तूप अशा वैविध्यपूर्ण घटकांचा वापर करून भूक शांत करणारे, ‘हेल्दी’ आणि ‘टेस्टी’ असे विविध पदार्थ तयार करण्यात आले आहेत.
 
 
‘एनर्जी बार’, ‘प्रोटीन बार’ (साधारणत: 15 ग्रॅम प्रोटीन प्रतिबार) ‘व्हिट कुकीज’, ‘Millet कुकीज’, चिक्कीचे प्रकार, नमकीनचे प्रकार, दिवाळीचे पदार्थ, (बेक्ड/ नोऑईल-चकली, करंजी, शंकरपाळे इ.) तीळलाडू, माव्यासारखे दिसणारे पोषक आणि टिकाऊ मोदक अशी खाद्यपदार्थांची रेलचेल आहे. हे सर्व पदार्थ ’जस्ट इट’ या त्यांच्या रजिस्टर्ड ब्रॅण्डअंतर्गत विक्रीस उपलब्ध आहेत. योग्य पद्धतीने निर्मिती होण्यासाठी त्यांनी लेखापरीक्षण करून ’ISO 22000:2018’ हे ‘फूड प्रोसेसिंग’साठी असणारे ’विशेष प्रमाणपत्र’देखील प्राप्त केले आहे,
 
 
सध्या मार्केटमध्ये ‘हेल्दी’ या सदराअंतर्गत कोणतेही पदार्थ विक्रीस ठेवले जातात. ’मल्टिग्रेन’ लिहून मैदा वापरणे, गूळ वापरला आहे, असं सांगून साखर वापरणे, ‘पाम ऑईल’चा सर्रास वापर करणे, कोणत्यातरी एका पोषक घटकाला ठळकपणे जाहिरातीमध्ये वापरून इतर हानिकारक घटकांविषयी ग्राहकांची दिशाभूल करणे, असे गैरप्रकार अगदी ‘मल्टिनॅशनल’ कंपन्यांकडूनदेखील चालू आहे. त्यातच आकर्षक जाहिरातींना बळी पडणार्‍यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.
 
 
 
याउलट ’जस्ट इट’ ब्रॅण्डचे खाद्यपदार्थ पोषणमूल्य असलेल्या धान्यांपासून तयार केले जातात. त्यात कोणतेही रंग, फ्लेवर्स, प्रीझर्व्हेटिव्ह्ज वापरले जात नाहीत. त्यांचे ‘शेल्फ लाईफ’ तीन ते सहा महिने असून ‘आकर्षक पॅकेजिंग’मध्ये हे खाद्यपदार्थ उपलब्ध आहेत. ‘सिंगल पॅक’पासून ‘फॅमिली पॅक’पर्यंतचे पर्याय उपलब्ध आहेत. त्यांचे कुरियरद्वारे घरपोच वितरणदेखील केले जाते.
 
 
सदर खाद्यपदार्थांसाठी मागणी वाढत असून लवकरच या खाद्यपदार्थ्यांच्या निर्यातीच्या दिशेने पावले उचलण्यात येणार आहेत. सदर खाद्यपदार्थांची खरेदी www.justeatfoods.com या ई-कॉमर्स संकेतस्थळावर करता येईल अथवा 7738193098 या क्रमांकावर व्हॉट्सअ‍ॅपद्वारे मागणी नोंदवता येईल. तसेच वितरणामध्ये सहभागासाठी (Distributor Ship) [email protected] या ईमेलवर किंवा 8108399449 या क्रमांकावर संपर्क साधता येईल.
 
 
आरोग्यासाठी केलेला खर्च ही तुमची उज्ज्वल निरोगी भविष्यासाठी केलेली गुंतवणूक असते आणि ती सर्वार्थाने लाभदायक ठरते, कारण 'It costs Money to Stay Healthy, but it is Expensive to get Sick'! चला तर मग टाकूया, निरोगी जीवनशैलीच्या दिशेने एक पाऊल, कारण असं म्हणतात, 'You don't have to see the whole staircase, just take the first step!'
 
 
- रचना लचके बागवे
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.